logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जिल्हा परिषद शाळा कोळीपाडा येथे खाऊ जत्रा उत्साहात संपन्न.

शहापूर -: तालुक्यातील केंद्रशाळा अजनुप अंतर्गत येणारी जिल्हा परिषद शाळा कोळीपाडा येथे विद्यार्थ्यांसाठी खाऊ जत्रा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे घरून बनवून आणलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना अनेक चांगले अनुभव मिळाले. आपल्या पदार्थांची विक्री,पैशांची देवाण-घेवाण, पदार्थांची जाहिरात, पैशांचा हिशेब, सुट्टे पैशांचा गणित, यासारख्या बाबींची माहिती झाली. विद्यार्थ्यांनी गुंतवलेली रक्कम भांडवल व मिळालेला नफा यातील आर्थिक गणित उलघडले. मुले अतिशय उत्साही होती. शाळेतील सर्व मुलांनी, गावातील ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व शाळेतील शिक्षकांनी या उपक्रमात सहभाग घेऊन सहकार्य केले. तसेच वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्याबरोबर, विद्यार्थ्यांबरोबर एक वेगळा अनुभव मिळाला. असे मत पालक व शिक्षकांनी व्यक्त केले.या वेगळ्या अनुभवामुळे विद्यार्थ्यांचा व्यवसाय करण्याविषयी आत्मविश्वास वाढला आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहता अशा प्रकारचे अध्ययन- अनुभव पुन्हा पुन्हा द्यावेत जेणेकरून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल आणि भविष्यामध्ये विद्यार्थी येणाऱ्या परिस्थितीशी सामोरे जाऊन स्वतः आत्मनिर्भर होऊन स्वावलंबी जीवन जगून स्वतः आपल्या पायावर उभे राहू शकतो असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण झाला आहे.सदर नाविण्यपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्यशिक्षिका श्रीमती दिपाली मधुकर जाधव, सह शिक्षक श्री. संजय जोतिबा होन्याळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.शाळेत असे नव-नवे उपक्रम व्हावेत अशी इच्छा व्यक्त करून शिक्षक व गावकर्यांनी एकमेकांचे आभार मानले.

23
1028 views

Comment