logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अखेर वामन यंगड मृत्यू प्रकरणी रायपूर पोलिसांत गुन्हा दाखल

वामन यंगड मृत्यू प्रकरणी रायपूर पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी | रायपूर
सादिक शाह aima media news network
माळवंडी येथील वामन यंगड यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात दहा दिवसांनंतर रायपूर पोलिसांनी अखेर संबंधित आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

१९ मार्च रोजी गावातील संदीप कड, चव्हाण आणि विजय नाटेकर हे वामन यंगड यांना त्यांच्या घरून सोबत घेऊन गेले होते. मात्र, काही वेळाने त्यांना मृत अवस्थेतच घरी आणून न सोडण्यात आले. वामन यंगड यांच्या या मृतदेहावर जखमांच्या खुणा आढळल्या होत्या. न विशेषतः डोक्यावर गंभीर वार करण्यात न आल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत होते. मृताचे कपडे बदलण्यात आल्याचेही समोर आल्याने हा निव्वळ अपघात नसून घातपात

असल्याचा संशय कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी व्यक्त केला होता.

घटनेनंतर आठवडा उलटूनही पोलिसांनी ठोस कारवाई न केल्याने परिसरात संतापाची लाट होती. पोलिसांकडून आरोपींना पाठीशी घातले जात ग्रामस्थांकडून करण्यात येत होता. या अन्यायाविरोधात अॅड. गुणवंत नाटेकर आणि राष्ट्रीय स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष अनिल सुरडकर यांनी आक्रमक पवित्रा घेत १४ एप्रिल रोजी पोलिस स्टेशनवर 'धडक मोर्चा' काढण्याचा इशारा दिला होता. आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे अखेर प्रशासकीय यंत्रणा हलली. २७ मार्चच्या रात्री उशिरा रायपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संबंधित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हा घातपात असल्याचे पुराव्यांवरून दिसत होते.

54
1821 views

Comment