दोन नव्या मेट्रो मार्गिकांच्या लोकार्पणाला अखेर मुर्हूत
दहिसर ते मिरा-भाईदर मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा १ आणि अंधेरी पश्चिम ते मंडाले,
दोन नव्या मेट्रो मार्गिकांच्या लोकार्पणाला अखेर मुर्हूत
दहिसर ते मिरा-भाईदर मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा १ आणि अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा १ मार्गिकेचे लोकार्पण गेल्या कित्येक दिवसांपासून रखडले होते.मुंबई : दहिसर ते मिरा-भाईदर मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा १ आणि अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा १ मार्गिकेचे लोकार्पण गेल्या कित्येक दिवसांपासून रखडले होते. या दोन्ही मार्गिकेतील पहिल्या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही लोकार्पण रखडल्याने दोन मार्गिकांच्या सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येत नव्हता. पण आता मात्र प्रवाशांची प्रतीक्षा संपली आहे. या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो ३ एप्रिलपासून धावणार आहे.
Expand