आनंदाची बातमी : ३ एप्रिलपासून दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो होणार सुरु
आनंदाची बातमी : ३ एप्रिलपासून दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो होणार सुरु भाईंदर :- मागील अनेक महिन्यांपासून नागरिक आतुरतेने वाट पाहत असलेली दहिसर मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका येत्या ३ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विशेष उपस्थित राहणार आहेत.
सबस्क्राईब करा
Subscribe at Rs 599
लोकसत्ता सविस्तर
लोकसत्ता प्रीमियम
देवेंद्र फडणवीस
बिग बॉस मराठी ६
चर्चेतील बातमी
Award Trophy
Chetak
Screen
Co Presented
By
Campa
Celebration
Partner
State
Partner
Retail Partner
Style Partner
In Partnership With
Industry Partners
Crafted By
Radio Partner
Broadcast Partner
Scripted & Directed by
Celebration
Partner
State
Partner
Retail Partner
Style Partner
In Partnership With
Industry Partners
Crafted By
Radio Partner
Broadcast Partner
Scripted & Directed by
Marathi News
vasaivirar
dahisar mira bhayandar metro line 9 inauguration date cm devendra fadnavis eknath shinde rds
आनंदाची बातमी : ३ एप्रिलपासून दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो होणार सुरु
मिरा भाईंदर शहराला मुंबईशी जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्याकडून दहिसर–मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ चे काम साधारण सात वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते.
Written by लोकसत्ता टीम
March 28, 2026 21:41 IST
Follow Us
Mira Bhayandar Metro Line 9 inauguration | Dahisar to Kashigaon Metro start date | Eknath Shinde Devendra Fadnavis Metro launch
दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून ३ एप्रिल रोजी याचे लोकार्पण होणार आहे. (छायाचित्र - लोकसत्ता टीम)
भाईंदर :- मागील अनेक महिन्यांपासून नागरिक आतुरतेने वाट पाहत असलेली दहिसर मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका येत्या ३ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विशेष उपस्थित राहणार आहेत.
मिरा भाईंदर शहराला मुंबईशी जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्याकडून दहिसर–मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ चे काम साधारण सात वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. या प्रकल्पात दहिसर ते काशिगाव आणि काशिगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान अशा दोन टप्प्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यातील पहिल्या टप्प्याचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले आहे.
दरम्यान, ही मेट्रो मार्च महिन्यापासून सुरू होणार असल्याचा दावा लोकप्रतिनिधींकडून केला जात होता. मात्र मार्च महिना संपत आला तरी मेट्रो प्रत्यक्ष सुरू न झाल्यामुळे प्रवासी हैराण झाले होते. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काशिगाव मेट्रो स्थानकाला भेट देऊन कामाची पाहणी केली होती. यावेळी मेट्रोचे काम पूर्ण झाले असून लवकरच लोकार्पण होणार असल्याचा दावा पुन्हा सरनाईक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला होता.त्यावरून ३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मेट्रो मार्गिकेला हिरवा कंदील दाखवण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. याबाबतची निमंत्रण पत्रिका एमएमआरडीएकडून तयार करण्यात आली असून, यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुमित्रा पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. त्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून मेट्रोच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना आता सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.