logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*बुटीबोरी MIDC मध्ये खळबळ — कंपनीतील पाण्याच्या टाकीत कामगाराचा मृतदेह आढळला*!

*बुटीबोरी MIDC मध्ये खळबळ — कंपनीतील पाण्याच्या टाकीत कामगाराचा मृतदेह आढळला*!

(गजानन ढाकुलकर ) बुटीबोरी : बुटीबोरी MIDC परिसरातील संविजय कंपनीमध्ये आज सकाळी ८वाजता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिनेश देवाजी सनेश्वर (वय ४१ वर्ष ), राहणार बामणी, कळमेश्वर येथील कामगाराचा मृतदेह कंपनीच्या आवारातील पाण्याच्या टाकीत आढळून आला. ही घटना दिनांक २८मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजता उघडकीस आली.

मृतदेह आढळताच परिसरात एकच खळबळ उडाली. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली असून मृतदेह पुढील तपासणीसाठी एम्स हॉस्पिटल येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. ही घटना कंपनीच्या आत घडल्यामुळे अनेक शंका-कुशंका उपस्थित होत असून कामगाराच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही।

या प्रकरणी बुटीबोरी एमआयडीसी पोलिसांनी तपास सुरू केला असून अपघात, आत्महत्या की घातपात याचा शोध घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे।

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

11
299 views

Comment