मार्च एंडपूर्वीच सिंधुदुर्गचा विक्रम ; २८२ कोटींचा १००% निधी वितरणात राज्यात अव्वल
✍️ शक्तिपथ Live || News Update
▫️प्रतिनिधी ll सिंधुदुर्ग
✒️ निर्भिडता आमची.. विश्वास तुमचा
सिंधुदुर्गनगरी, दि-२८:- मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर प्रशासनात निधी खर्च आणि वितरणाची धावपळ सुरू असते. मात्र, यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याने ही धावपळ यशस्वी नियोजनात रूपांतरित करत राज्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्याचा २८२ कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा १०० टक्के पूर्ण करत, सर्व संबंधित विभागांना निधी वितरित करण्यात सिंधुदुर्गने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यादीत अमरावती जिल्हा द्वितीय स्थानी आहे.
जिल्ह्यातील विविध सरकारी विभागांच्या सुमारे १०० योजनांद्वारे यंदा मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली. या कामांना गती देण्यासाठी राज्य शासनाने २८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. विशेष म्हणजे, मार्च अखेर येण्यापूर्वीच हा संपूर्ण निधी संबंधित विभागांना यशस्वीरित्या वितरित करण्यात आला आहे. परिणामी अनेक विकासकामे पूर्णत्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहेत.
जिल्ह्यातील विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज करत निधी वितरण प्रक्रिया वेगवान ठेवली. तसेच जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी विविध विभागांमध्ये समन्वय साधत निधी वेळेत वितरित होईल याची प्रभावी अंमलबजावणी केली.
या संयुक्त प्रयत्नांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याने केवळ निधी वितरणातच नव्हे, तर विकासकामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीतही आघाडी घेतली आहे. मार्च एंडपूर्वीच १०० टक्के निधी वितरित करण्याची ही ऐतिहासिक कामगिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली असून, राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही ती मार्गदर्शक ठरणार आहे.
━━━━━━━━━━━━━━━
शक्तिपथ Live न्यूज- निर्भिडता आमची… विश्वास तुमचा!
_______________________
📲 नवीन अपडेट, ब्रेकिंग न्यूज आणि खास बातम्या आता सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर!
---------------------------------
👉 आमच्या शक्तिपथ Live न्यूज चॅनलच्या अधिकृत WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा*⤵️https://chat.whatsapp.com/BifUPzLiio1Cqhjh4lpID4
________________________
📞 बातम्या पाठवण्यासाठी / संपर्कासाठी आपल्या परिसरातील घटना, बातम्या, फोटो किंवा व्हिडिओ आम्हाला पाठवण्यासाठी खाली संपर्क करा मोबाईल नंबर ⤵️ 9022567457/9689434374