logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

गृप ग्रामपंचात अजनुप- दापुरची ग्रामसभेची बैठक तहकूब.


शहापूर - लोकशाहीमध्ये ग्रामसभेला अनन्यसाधारण महत्त्व असुन त्र्याहत्तराव्या दुरुस्तीने ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे. या दुरुस्ती ने ग्रामसभेला अनेक विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत, त्यामुळे ग्रामसभा अधिक सशक्त झाल्याचे मानले जाते.प्रत्येक गावांतील ग्रामस्थांनी एकत्र येत गावाच्या विकासासाठी विविध विषयांवर चर्चा करुन आपल्या गावाचा,समाजाचा विकास कसा साधायचा यासाठी ग्रामसभा हे उत्तम माध्यम मानले जाते.परंतु बहुतांशी ठिकाणी ग्रामसभेच्या बैठकी तहकूब होण्याच्या घटना घडत आहेत.त्यापैकीच शहापूर तालुक्यातील गृप ग्रामपंचायत अजनुप-दापुर ची ग्रामसभेची माहे ऑगस्ट ते आजतागायत एकही बैठक यशस्वी होऊ शकलेली नाही.यातच दिनांक २४ मार्च २०२६ रोजी मौजे दापुर या ठिकाणी ग्रामसभेची बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीमध्ये, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविणे,सन२०२६-२७ चे वार्षिक नियोजन करणे,सन२०२५-२६ पुरवणी आराखडा तयार करणे, कुष्ठरोग शोध अभियान राबविणे, सुर्यघर योजना राबविणे, मेरा गावं मेरा धरोहर योजना राबवणे, बालविवाह कायद्याची जनजागृती करणे, यांसारखे महत्त्वाचे विषय चर्चेसाठी होते, सदर नियोजीत ग्रामसभेच्या बैठकीच्या ठिकाणी प्रोसिडींग बुकातील नोंदीनुसार चार ग्रामस्थांची नोंद झाली आहे व कर भरणा करण्यासाठी तसेच मतदार यादी तपासणी साठी येणाऱ्यांची संख्या अंदाजे दहा ते बारा होती. ग्रामसभेच्या सचिवांच्या गैरहजेरी संदर्भात, ते शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल असल्याचे सांगण्यात आले.ग्रामपंचायत कर्मचारी तसेच पेसा समन्वयक आणि रोजगार सेवक उपस्थित होते.वेळोवेळी तहकूब होत असलेल्या ग्रामसभेच्या बैठकांवर उपस्थित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.त्यास उत्तर देताना, ग्रामसभा आयोजित केली जाते परंतु ग्रामस्थ उपस्थित रहात नसल्याचे ग्रामपंचायत कर्मचार्यांनी स्पष्ट केले. या वरुन संपूर्ण तालुक्यात ग्रामसभा यशस्वीरित्या पार पडतात किंवा कसे व याला जबाबदार कोण, हा एक संशोधनाचा विषय आहे.

18
735 views

Comment