रावेर येथील मोठ्या राम मंदिरात रामजन्म महोत्सव व नवान्य पारायण उत्साहात संपन्न
बातमी:
रावेर येथील महाराजा अग्रेसर चौक नाल्यावर असलेल्या मोठ्या राम मंदिरात नवान्य पारायण व श्रीराम जन्म महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या धार्मिक कार्यक्रमात श्री कपिल महाराज, संतोष काका चौधरी विशाल शेठ अग्रवाल, श्री राजेंद्र शेठ अग्रवाल, मनसुख लोहार लोहार मयूर कासार, चंद्रकांतजी अग्रवाल, साठे महाराज, कुंदन बाविस्कर यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला.
तसेच परिसरातील सर्व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहाटेपासूनच भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक विधी, पारायण व श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मंदिर परिसरात भक्तांची गर्दी उसळली होती आणि सर्वत्र आनंद व भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले.