तलाठ्याच्या घराची झडती
जळगाव : खरेदी केलेल्या शेतजमिनीची
नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला करंज येथील तलाठी अजय बिडवे याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे व सहकाऱ्यांनी तलाठी बिडवे याच्या घराची झडती घेतली. मात्र त्याच्या घरात संशयास्पद रक्कम अथवा अन्य काही सापडले नाही