सत्ताधारी भाजपाचे पुण्यात महिलांना मोठे गिफ्ट! पुणे शहरात आता महिलांच्या नावे घर असल्यास मिळणार मिळकतकरात ५० टक्के करमाफीः स्थायी समितीचा मोठा निर्णय
सत्ताधारी भाजपाचे पुण्यात महिलांना मोठे गिफ्ट! पुणे शहरात आता महिलांच्या नावे घर असल्यास मिळणार मिळकतकरात ५० टक्के करमाफीः स्थायी समितीचा मोठा निर्णय
महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना देत "सशक्त महिला -सक्षम समाज" या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांची घोषणा केली. त्यामध्ये महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि सुरक्षिततेशी संबंधित गरजांचा विचार करण्यात आला आहे.
- महिलांच्या मालकी हक्काला प्रोत्साहन देण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या महिलांच्या नावावरील मिळकतींना ५० टक्के मिळकत करमाफी देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. - महिलांच्या सुरक्षितता आणि सन्मानाच्या दृष्टीने शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी १०० अद्ययावत आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी केली जाणार आहे. - महिलांमध्ये आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना वाढीस लागावी यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्र सुरू करून ज्युदो, कराटे, लाठी-काठी, योगासने यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. - बचत गटांद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कौशल्य विकास, उद्योजकता प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी आणि कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.