logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

केळी उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद: केळी दराबाबत आढावा बैठक संपन्न

केळी उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद: केळी दराबाबत आढावा बैठक संपन्न झाली.

तालुका प्रतिनिधी:-
जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी
दि.२५ मार्च, २०२६

जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे नगदी पीक असलेल्या केळीच्या दरामधील चढ-उतारासंदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी जळगाव यांनी दुरचित्रवाणी परिषदेद्वारे कृषी उत्पन्न बाजार समिती, रावेर येथील पदाधिकारी, व्यापारी आणि शेतकरी यांच्याशी सविस्तर संवाद साधला.

बैठकीतील प्रमुख मुद्दे:

दर निश्चिती चर्चा: केळीचे एकूण उत्पादन आणि मालाचा दर्जा (Quality) यानुसार केळी दर निश्चितीच्या प्रक्रियेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बाजार समिती आढावा: कृषी उत्पन्न बाजार समिती, रावेर येथील सभापती, उपसभापती व संचालक मंडळाकडून बाजारपेठेतील सद्यस्थिती आणि व्यवहारांबाबत माहिती घेण्यात आली.

अडचणींचे निराकरण: केळी उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांनी मांडलेल्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी समजून घेऊन, त्यावर प्रशासकीय स्तरावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली.

उद्दिष्ट: शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळवून देणे आणि केळी व्यापार साखळीतील पारदर्शकता टिकवून ठेवणे, हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

प्रशासकीय भूमिका: जिल्हा प्रशासन केळी उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शेतीमालाला रास्त भाव मिळावा आणि बाजारपेठेत सुसूत्रता राहावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे.

0
57 views

Comment