logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

Aima midiya jan jan ki avaj Date 27.3.2026 10:39पुणे : श्रीराम नवमीनिमित्त वाहतूक बदल श्रीरामनवमीनिमित्त पुणे शहरात गुरुवारी दुपारी चारनंतर वाहतूक बदल

Aima Media jan ki avaj Date 27.3.2026 10:39पुणे : श्रीराम नवमीनिमित्त वाहतूक बदल
श्रीरामनवमीनिमित्त पुणे शहरात गुरुवारी दुपारी चारनंतर वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.पुणे : श्रीरामनवमीनिमित्त बाजीराव रस्ता आणि लष्कर भागातून मिरवणूक काढण्यात येणार असल्याने गुरुवारी (२६ मार्च) दुपारी चारनंतर वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.बाजीराव रस्ता आणि लष्कर भागातील वाहतूक बदल रात्री दहापर्यंत लागू राहणार आहे. मिरवणूक मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून, वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

टिळक रस्त्यावरील पूरम चौकातून बाजीराव रस्त्याकडे जाणारी वाहतूक टिळक रस्त्यावरून वळविण्यात येणार आहे. शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी टिळक रस्ता, टिळक चौक (अलका चित्रपटगृह चौक), छत्रपती संभाजी पूल, डेक्कन जिमखानामार्गे शिवाजीनगरकडे जावे.लष्कर भागातील वाय जंक्शन येथून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. लष्कर भागातील मिरवणूक ट्रायलक चौकातून १५ ऑगस्ट चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर महात्मा गांधी रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. महंमद रफी चौकातून मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक ‘ईस्ट स्ट्रीट’मार्गे वळविण्यात येणार आहे. लष्कर भागातील वाहतूक टप्याटप्याने बंद ठेवण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर टप्याटप्याने रस्ते खुले करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.पेरूगेट रस्ता बंद; नागरिकांच्या तक्रारी
टिळक स्मारक ते पेरूगेटदरम्यान असलेला रस्ता श्रीराम नवमीच्या कार्यक्रमासाठी बुधवारी दुपारपासून बंद करण्यात आला. या भागात ध्वनिवर्धक, तसेच विद्युत रोषणाईसाठी लोखंडी सांगाडा उभा करण्यात आल्याने वाहनचालकांची, रहिवाशांची गैरसोय झाली. या बाबत नागरिकांनी वाहतूक पोलिसांकडे तक्रारी केल्या. स्थानिक पोलिसांनी कार्यक्रमासाठी परवानगी दिली असल्याचे समजले. अखेर सायंकाळी संबंधित कार्यक्रमाच्या आयोजकांना संपूर्ण रस्ता बंद न करता वाहनचालकांसाठी जागा सोडण्याची सूचना केली. गोखलेनगर भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही मंडळांकडून मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या देखाव्यांनी जागा व्यापल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.

0
0 views

Comment