Aima midiya jan jan ki avaj Date 27.3.2026 10:34 दैवी असल्याची बतावणी करुन पुण्यात महिलेवर अत्याचार – पुणे, वसईतील घटना, भोंदू पसार
पुण्यात दैवी शक्ती
Aima midiya jan jan ki avaj Date 27.3.2026 10:34 दैवी असल्याची बतावणी करुन पुण्यात महिलेवर अत्याचार – पुणे, वसईतील घटना, भोंदू पसार
पुण्यात दैवी शक्तीचा बनाव करून एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी ऋषीकेश वैद्य या भोंदूविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर पीडित महिलेने धाडस दाखवत पुणे आणि वसई पोलिसांत तक्रार दिली.पुणे : नाशिकमधील भोंदू अशोक खरात याने महिलांवर अत्याचार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करुन एका भोंदूने महिलेवर अत्यचाार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित गुन्हा तपासासाठी पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून भोंदू पसार झाला.
होम
ईपेपर
महाराष्ट्र
शहर
देश-विदेश
क्रीडा
सत्ताकारण
विश्लेषण
हेल्थ
अर्थभान
राशिभविष्य
मनोरंजन
ट्रेंडिंग
लाइफस्टाइल
विचारमंच
फोटो
सबस्क्राईब करा
Subscribe at Rs 599
लोकसत्ता सविस्तर
लोकसत्ता प्रीमियम
देवेंद्र फडणवीस
बिग बॉस मराठी ६
चर्चेतील बातमी
Award Trophy
Chetak
Screen
Co Presented
By
Campa
Celebration
Partner
State
Partner
Retail Partner
Style Partner
In Partnership With
Industry Partners
Crafted By
Radio Partner
Broadcast Partner
Scripted & Directed by
Celebration
Partner
State
Partner
Retail Partner
Style Partner
In Partnership With
Industry Partners
Crafted By
Radio Partner
Broadcast Partner
Scripted & Directed by
Marathi News
pune
bhondu baba rishikesh vaidya booked for rape in pune and vasai after ashok kharat case pune print news rub
दैवी असल्याची बतावणी करुन पुण्यात महिलेवर अत्याचार – पुणे, वसईतील घटना, भोंदू पसार
पुण्यात दैवी शक्तीचा बनाव करून एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी ऋषीकेश वैद्य या भोंदूविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर पीडित महिलेने धाडस दाखवत पुणे आणि वसई पोलिसांत तक्रार दिली.
Written by लोकसत्ता टीम
पुणे
March 27, 2026 17:20 IST
Follow Us
bhondu-baba-rishikesh-vaidya-booked-for-rape-in-pune-and-vasai-after-ashok-kharat-case
पुणे: नाशिकनंतर आता पुण्यात भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार; दैवी शक्तीची बतावणी करून महिलेवर अत्याचार, आरोपी पसार. (संग्रहित छायाचित्र)
पुणे : नाशिकमधील भोंदू अशोक खरात याने महिलांवर अत्याचार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करुन एका भोंदूने महिलेवर अत्यचाार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित गुन्हा तपासासाठी पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून भोंदू पसार झाला.
याबाबत एका ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, भोंदू ऋषीकेश वैद्य याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मूळची पुण्यातील आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये महिलेची समाज माध्यमातून तिची ओळख झाली. आरोपी वैद्य हा मूळचा वसईचा आहे.
पीडित महिला व्रतवैकल्ये करायची, तसेच ती धार्मिक आहे. भोंदूने तिला जाळ्यात ओढले. माझ्यात दैवी संचार आहे. ईश्वराची उपासना कशी करायची, याचे तंत्र तुला शिकवितो, अशी बतावणी त्याने महिलेकडे केली. त्यानंतर त्याने महिलेला जाळ्यात ओढले. आरोपी २०२३ मध्ये पुण्यात आला. त्याने पीडित महिलेची भेट घेतली. मांजरी परिसरात तो तिला भेटला. त्यानंतर त्याने गुंगीचे ओैषद देऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने तिला पुन्हा वसईत बोलावले. वसईतही तिच्यावर बलात्कार केला, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.अशोक खरात प्रकरणानंतर तक्रार
नाशिकमधील भोंदू अशोक खरात याने महिलांना जाळ्यात ओढून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यातील पीडित महिलेने पाेलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती तिने पोलिसांनी दिली. सुरुवातीला तिने वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वसई पोलिसांनी संंबंधित गुन्हा तपासासाठी पुण्यातील हडपसर भागात असलेल्या मांजरी पोलीस ठाण्यात तपासासाठी वर्ग केला.
भोंदूच्या शोधासाठी पोलिसांची पथके
भोंदू ऋषीकेश वैद्य हा पसार झाला असून, त्याचा वसई, तसेच पुणे पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची चार पथके पसार आरोपीचा शोध घेत आहे.
पीडित महिलांनी तक्रार द्यावी
पीडीत महिलेने वसईतील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर संबंधित गुन्हा तपासासाठी पुणे पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. भोंदू ऋषीकेश वैद्य याने आणखी काही महिलांवर अत्याचार केल्याची शक्यता आहे. दैवी शक्तीचा संचार झाल्याची बतावणी करुन त्याने महिलेवर अत्याचार केेले. अशा प्रकारची तक्रार असल्यास पीडित महिलांनी पुणे पोलिसांकडे तक्रार द्यावी, असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी केले आहे.