अखेर कोळीपाड्याची विहीर झाली गाळ मुक्त.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याची ओळख ही आदिवासी तालुका,धरणांचा तालुका त्याचप्रमाणे दुष्काळग्रस्त तालुका म्हणून देखील आहे, आदिवासी बहुल शहापूर तालुक्यात मुंबई तसेच उपनगरांना पाणी पुरवठा करणारी तानसा, भातसा, मोडकसागर, मध्य वैतरणा यांसारखी मोठी धरणे आहेत.मात्र तरी देखील तालुक्यातील असंख्य गाव पाड्यांना दरवर्षी पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो,यावर तात्पुरता उपाय म्हणून शासन दरवर्षी टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत असते .त्यातच विहिरी पुर्णपणे कोरड्या पडुन त्यात वर्षभराचा गाळ साचलेला असतो, त्यामुळे दरवर्षी विहीरतील गाळ काढावा लागतो, त्याशिवाय पाणी पिण्यायोग्य रहात नाही.त्यापैकीच तालुक्यातील गृप-ग्रामपंचायत अजनुपमधील कोळीपाडा येथील विहीर त्यातलीच एक. गाळमीश्रीत दुषीत पाणी पिल्यास विविध आजार होण्याची शक्यता असते . त्यामुळे येथील ग्रामस्थांनी एकत्र येत, ग्रामपंचायतच्या सहकार्याने विहीरीतील गाळ काढण्याचे काम हाती घेउन पुर्ण केले.या कामी कोळीपाडा ग्रामस्थ यादव कोंडीराम शिंदे, बाळू रामा जागले ,दादु लालु जाधव , तुषार बाळु खेताडे, रमेश देवराम घारे,सुदाम विष्णू जागले, सुरेखा तुळशीराम जागले ,मंजुळा बाळू खेताडे ,रेखा रमेश घारे, वैशाली लालू जाधव, लीला शांताराम सारक्ते, उषा कोंडीराम शिंदे.इत्यादींनी मेहनत घेतली.या कामी ग्रामपंचायतीचे विशेष सहकार्य लाभले.