logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भारतीय जनवादी पार्टी सदस्यपदी श्री महेश चंद्रकांत आरणे यांची निवड.

भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कार्यालयात श्री अनिल मल्लाव यांचे आदेशाने आज संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये भारतीय जनवादी पार्टी सदस्यता विषयी मीटिंग भरवण्यात आली. भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री. प्रवीण घेमूड भारतीय जनवादी पार्टीचे पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री. लक्ष्मण शरद मल्लाव यांचे आदेशाने श्री. महेश चंद्रकांत आरणे यांची भारतीय जनवादी पार्टी सदस्यता म्हणून निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेमध्ये भारतीय जनवादी पार्टीचे महाराष्ट्र संघटन सचिव श्री योगेश डोळस, भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी समिती श्री.बबन कनिच्छे व पुणे जिल्हाध्यक्ष श्री लक्ष्मण मल्लाव व भारतीय जनवादी पार्टी , तालुका कोषाध्यक्ष व पार्टी कार्याध्यक्ष श्री. करण मल्लाव शिरूर तालुका सरचिटणीस श्री माधव सल्ले यांच्या उपस्थितीत त्यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या भाषणामध्ये भारतीय जनवादी पार्टी एक राष्ट्रीय पक्ष पार्टी आहे. तसेच लोकशाही प्रक्रिया मजबूत करण्यासाठी संविधानिक हक्काचे रक्षण करण्यासाठी आणि सर्वांना न्याय समता आणि प्रतिष्ठा उपलब्ध असेल असा समाज निर्माण करण्यासाठी पक्ष वचनबद्ध आहे. तळागाळातील सहभाग सर्वांचा सहभाग आणि पारदर्शक राजकीय नेतृत्वाद्वारे पक्षाची उद्दिष्ट प्रशासन सामाजिक कल्याण शिक्षण आणि राजकीय विकासात अर्थपूर्ण बदल घडून आणण्याचे आहेत. तालुका सरचिटणीस माधव सल्ले यांनी सर्वांचे आभार मानले. नवीन सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन व निवड झाल्याबद्दल पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐

20
846 views

Comment