logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

Aima midiya jan jan ki avaj Date 27.3.2026 am12:38 पुण्यात स्टोव्हचे दिवस परतले...! लोकांनी अडगळीत, पोटमाळ्यावर ठेवलेले स्टोव्ह दुरुस्तीसाठी आणले...इर

Aima midiya jan jan ki avaj Date 27.3.2026 am12:38 पुण्यात स्टोव्हचे दिवस परतले...! लोकांनी अडगळीत, पोटमाळ्यावर ठेवलेले स्टोव्ह दुरुस्तीसाठी आणले...इराण-अमेरिका, इस्रायल युद्धामुळे जगभरात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारत कशीबशी आपली जहाजे बाहेर काढत आहे. परंतू, देशासमोर इंधन टंचाईचे संकट उभे ठाकलेले आहे. केंद्र सरकारच्या मालकीच्या एलपीजी गॅस पुरवठादार कंपन्यांनी दोन सिलिंडरमधील बुकिंगचा कालावधी वाढविला आहे. शहरात २५ दिवस आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांवर केल्याने आता लोकांना लाकडाच्या चुली आणि रॉकेलवर चालणारे स्टोव्ह काढण्यास सुरुवात केली आहे.

हे चित्र छोट्या शहरातील किंवा ग्रामीण भागातील नसून पुण्यातील आहे. रेशनवर सरकारने रॉकेल पुन्हा उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे गॅस टंचाई आणि गॅस वाचविण्यासाठी लोकांनी घरातील अडगळीत पडलेले आणि पोटमाळ्यावर ठेवलेले जुने स्टोव्ह दुरुस्त करण्यास सुरुवात केली आहे. रॉकेल रेशन दुकानावर उपलब्ध होऊ लागले आहे. याचे दर लीचरमागे ६० रुपये असल्याचे या लोकांनी सांगितले. तसेच काळ्या बाजारातही रॉकेल मिळते, त्यासाठी १००-१२० रुपये मोजावे लागतात असेही त्यांनी सांगितले.

कधी कशाची गरज लागेल...
आज कधी कशाची गरज लागेल याबाबत काहीच सांगता येणार नाही अशी परिस्थिती आहे. एलपीजी आल्याने रॉकेलवरील स्टोव्ह बंद झाले होते. यामुळे त्यांना लागणारे सुटे पार्ट जसे की स्टोव्हची पिन, पंप करण्यासाठी लागणारे आतील वायसर, बर्नर, चावी आदी गोष्टी कंपन्यांनी बनविणे बंद केले होते. आता पुन्हा त्याची मागणी आली आणि लोकांकडून शोधाशोध सुरु झाली आहे. या जुन्या दुकानदारांकडे देखील ते पुरेसे उपलब्ध नाहीय. भविष्यात युद्ध वाढले आणि इंधन टंचाई झालीच तर मात्र या गोष्टींची पुन्हा मागणी वाढण्याची शक्यता असल्याचे या दुकानदारांनी सांगितले.

4
79 views

Comment