logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी; चोरट्यांचा १८ दुचाकी चोरण्याचा ‘प्लॅन’ फसला! नागपूर (सतीश भालेराव) : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या वाहन च

एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी; चोरट्यांचा १८ दुचाकी चोरण्याचा ‘प्लॅन’ फसला!नागपूर (सतीश भालेराव) : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या वाहन चोरी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी मोठी कारवाई करत एक आरोपी अटक करून तब्बल १८ दुचाकी वाहने जप्त केली आहेत. या जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे ७ लाख ३० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा क्रमांक १५१/२०२६ कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी शशिकांत तुलशीराम राऊत (वय ४५ वर्षे, पंचशील नगर, अंबेडकर मार्ग, नागपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ०२ मार्च २०२६ रोजी सकाळी ०७.२५ ते ०७.५५ दरम्यान त्यांच्या ताब्यातील होंडा ड्रीम युगा (MH-49-AZ-5421) ही दुचाकी कार्यालयासमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती.

या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे प्रवेश कन्हेलाल कंगाले (वय ३८ वर्षे, पोलिस लाईन टाकळी, नागपूर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीकडून एकूण १८ दुचाकी वाहने जप्त केली, ज्यामध्ये होंडा, स्प्लेंडर, पॅशन प्रो, बजाज फ्लेअर यांसारख्या विविध कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. जप्त वाहनांची एकूण किंमत ७ लाख ३० हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस उपायुक्त (परिमंडळ ०२) सिंगल रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गुरव, तसेच पोलीस निरीक्षक वपोनि गोकुळ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोउपनि पंकज सखाराम, पोहेकॉ राजेश वरठी, विजय जाने, पोशी सचिन सोनवणे, पोशी मुरलीधर केवट आणि मनोज सोनवणे यांचा सहभाग होता. सदर गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाणे, नागपूर करत असून आरोपीकडून आणखी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

0
0 views

Comment