logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

Aima midiya jan jan ki avaj Date 27.3.2026 am12:26 मुंबईच्या डबेवाल्यांची वारी आता ई-बाइक्सवर; महापौर रितू तावडे यांची १०५ ई-बाइक्सची मोठी घोषणा!मुंबई

Aima midiya jan jan ki avaj Date 27.3.2026 am12:26 मुंबईच्या डबेवाल्यांची वारी आता ई-बाइक्सवर; महापौर रितू तावडे यांची १०५ ई-बाइक्सची मोठी घोषणा!मुंबई : मुंबईची ओळख बनलेली डबेवाला सेवा आजही आपल्या शिस्तबद्ध कार्यपद्धती, अचूक वेळ पाळण्याची सवय आणि प्रामाणिकपणामुळे जगभरात कौतुकास पात्र ठरत आहे. या अनोख्या व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करत रितू तावडे यांनी डबेवाल्यांना मुंबईच्या सेवा संस्कृतीचे खरे प्रतिनिधी असल्याचे गौरवोद्गार काढले. वांद्रे येथील Mumbai Dabbawala International Experience Center येथे दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी डबेवाल्यांच्या कामकाजाची सखोल माहिती घेतली. डबे वर्गीकरण, कोडिंग आणि वितरणाची गुंतागुंतीची प्रक्रिया अत्यंत कमी त्रुटींनी पार पाडण्याच्या त्यांच्या कौशल्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

सुमारे १३५ वर्षांची परंपरा लाभलेल्या या सेवेद्वारे आजही दररोज सुमारे एक लाख डबे वेळेत पोहोचवले जातात. वारकरी परंपरेतून प्रेरित असलेली ही सेवा केवळ उपजीविकेचे साधन नसून निष्ठा, समर्पण आणि संघभावनेचे जिवंत उदाहरण आहे. यावेळी बोलताना रितू तावडे यांनी सांगितले की, डबेवाला व्यवस्था ही व्यवस्थापन शिकणाऱ्यांसाठी आदर्श मॉडेल आहे. त्यांच्या कार्यपद्धतीतून वेळेचे नियोजन, समन्वय आणि विश्वास यांचे उत्कृष्ट उदाहरण पाहायला मिळते. महापौरांनी डबेवाल्यांच्या हितासाठी काही महत्त्वपूर्ण उपक्रमांचीही माहिती दिली. त्यामध्ये १०५ ई-बाइक्स उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव असून, त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच, मुंबईतील प्रवेशद्वारांपैकी एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर आधारित उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. डबेवाल्यांशी संवाद साधताना त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेत, Mumbai Tiffin Box Suppliers Association सोबत समन्वय ठेवून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. डबेवाला सेवा १८९० पासून अखंडपणे सुरू असून अनेक संकटांचा सामना करत आजही तितक्याच ताकदीने उभी आहे. कोविड काळातही समाजाकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे ही परंपरा टिकून राहिली.आज डबेवाले केवळ मुंबईतच नव्हे तर जागतिक स्तरावर व्यवस्थापन, वेळेचे नियोजन आणि उत्कृष्ट सेवा यांचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे मुंबईच्या सेवा संस्कृतीला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळाली आहे.

0
0 views

Comment