logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

Pune Muncipal Corporation : पुणे महापालिकेच्या सात अधिकाऱ्यांची होणार चौकशी ! मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी उघडकीस आणलेल्या या प्रकरणात दोन उपायुक

Pune Muncipal Corporation : पुणे महापालिकेच्या सात अधिकाऱ्यांची होणार चौकशी !
मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी उघडकीस आणलेल्या या प्रकरणात दोन उपायुक्त आणि कार्यकारी अभियंत्यांचा समावेश आहे.पुणे : महापालिकेच्या भांडार विभागाने कोट्यवधी रुपयांचे साहित्य खरेदी करून त्याचा कोणताही वापर न केल्याप्रकरणी सात अधिकाऱ्यांच्या खात्यांतर्गत चौकशीचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रसंगी महापालिकेचे झालेले नुकसान वसूल करण्याची सूचनाही आयुक्तांनी केली आहे.होम
पुणे महापालिकेच्या सात अधिकाऱ्यांची होणार चौकशी !
मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी उघडकीस आणलेल्या या प्रकरणात दोन उपायुक्त आणि कार्यकारी अभियंत्यांचा समावेश
पुणे महापालिकेच्या भांडार विभागात झालेल्या साहित्य खरेदी गैरव्यवहार प्रकरणी ७ अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. (ai generated images)
पुणे : महापालिकेच्या भांडार विभागाने कोट्यवधी रुपयांचे साहित्य खरेदी करून त्याचा कोणताही वापर न केल्याप्रकरणी सात अधिकाऱ्यांच्या खात्यांतर्गत चौकशीचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रसंगी महापालिकेचे झालेले नुकसान वसूल करण्याची सूचनाही आयुक्तांनी केली आहे.

महापालिकेच्या भांडार विभागाने कोट्यवधी रुपयांचे साहित्य खरेदी करून त्याचा कोणताही वापर न करता धूळखात गोदामात पडून असल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उजेडात आणला होता. मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी हा प्रकार महापालिका आयुक्त राम यांच्या निदर्शनास आणून या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

या प्रकाराची गंभीर दखल घेत आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजयकुमार थोरात यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने या प्रकरणाशी संबधित असलेल्या २० अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कामात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस बजाविली होती.यामध्ये संबधित अधिकाऱ्यांना लेखी खुलासा करण्यास सांगितले होते. त्यानंतर संबधित अधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी म्हणणे सादर केले. हा खुलासा लक्षात घेत अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सात अधिकाऱ्यांचा खुलासा मान्य नसल्याचे सांगत त्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्याची शिफारस महापालिका आयुक्त राम यांच्याकडे केली होती.

या शिफारशीचा आधार घेत आयुक्त राम यांनी महापालिकेतील सात अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्याकडून नुकसान वसूल करण्याच्या सूचना केल्या आहेत. दोन उपायुक्त, कार्यकारी अभियंता, दोन्ही विभागांचे तत्कालीन अधीक्षक यांचा त्यामध्ये समावेश आहे.मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस म्हणाले, कोट्यवधी रुपयांची खरेदी करून या वस्तू धूळखात गोदामात पडून होत्या. या प्रकरणामध्ये २० अधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आली होती. सात जणांचा खुलासा समाधानकारक न वाटल्याने ही कारवाई केली आहे. उर्वरित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काय खुलासा केला याची माहिती घेतली जाईल. सर्व दोषींवर कारवाई झाली पाहिजे.महापालिकेच्या भांडार विभागाने २०१५ मध्ये कर्मचाऱ्यांसाठी ७५ लाख रुपयांचे गणवेशाचे कापड, ६९.७१ लाखाच्या साड्या खरेदी केल्या. त्याचे पैसे ठेकेदाराला दिले. पण प्रत्यक्षात गेल्या अनेक वर्षांमध्ये संबधित कर्मचाऱ्यांना हे खरेदी केलेले कपडे दिले गेले नाही. तसेच महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या मागणीनुसार भांडार विभागाने ५० लाख रुपये खर्च करून ऑगस्ट २०२३ मध्ये २० हजार किलो सिटी वेस्ट ट्रीटमेंट पावडर, ४ हजार लिटर लिक्विड बायोकॅटॅलिस्ट इको चीपची खरेदी केली होती. ही खरेदी देखील धूळखात पडून होती. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन, भांडार तसेच वित्त विभागाने ठेकेदारांची बिले काढण्यासाठी या कामांच्या निविदा काढल्याचा आरोप मनसेने केला होता.

1
24 views

Comment