तळोदा सहायक प्रकल्प अधिकाऱ्यास पोलिस कोठडी
तळोदा : आदिवासी विकास विभागाच्या
छत्रपती संभाजीनगर प्रकल्पाच्या वसतिगृहांमधील भोजन देयकातील. भ्रष्टाचार प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेले येथील सहायक प्रकल्प अधिकारी उत्तम राऊत यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
न
-
छ. संभाजीनगर येथील शासकीय वसतिगृहातील भोजन देयकात गैरव्यवहार करण्यात आला आहे. सन २०१६ ते २०२० या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांनी बनावट हजेरीपत्रक तयार करून विद्यार्थ्यांची हजेरीसंख्या वाढवली होती. या गैरप्रकारातून २० ते २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. उच्च न्यायालयाचा आदेशाने चौकशी प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यात अर्जदार व संबंधित अधिकाऱ्याचे जवाब नोंदविणे, शासकीय कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. चौकशीत ठेक्यात अनियमितता स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता.