logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कळंबोली येथे रोबोटिक्स शिक्षणाचा नवा उपक्रम; शाळांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

कळंबोली येथे रोबोटिक्स शिक्षणाचा नवा उपक्रम; शाळांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

कळंबोली (पनवेल):
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि प्रोग्रामिंग या क्षेत्रांचे महत्त्व झपाट्याने वाढत आहे. देशात या तंत्रज्ञानाच्या विकासावरही भर दिला जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केलेल्या Union Budget 2026–27 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासावर विशेष भर देण्यात आल्याचे अधोरेखित केले आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना लहान वयापासून तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने कळंबोली येथे “टेकस्पेस प्रोग्रामिंग इन्स्टिट्यूट”तर्फे रोबोटिक्स शिक्षणाचा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रोग्रामिंग यांची ओळख करून देत प्रत्यक्ष रोबोट तयार करणे, सेन्सर वापरणे आणि सोपे ऑटोमेशन प्रोजेक्ट्स तयार करणे यासारख्या गोष्टी शिकविल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष प्रयोग आणि प्रोजेक्टच्या माध्यमातून तंत्रज्ञान समजावून सांगण्यावर या उपक्रमात भर दिला जाणार आहे.

टेकस्पेस प्रोग्रामिंग इन्स्टिट्यूटचे संस्थापक ओमकार जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच तंत्रज्ञानाबद्दल आवड आणि नवकल्पना करण्याची वृत्ती विकसित व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

टेकस्पेसमध्ये विद्यार्थ्यांना रिअल-लाईफ प्रोजेक्ट्स, प्रोग्रामिंग आणि रोबोटिक्सचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. तसेच विद्यार्थ्यांना भविष्यातील उद्योगजगताची ओळख व्हावी यासाठी LinkedIn आणि Microsoft Teams यांसारख्या प्लॅटफॉर्मची माहितीही दिली जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट वातावरणाची प्राथमिक ओळख मिळते.

३ मे २०२५ रोजी सुरू झालेल्या टेकस्पेस प्रोग्रामिंग इन्स्टिट्यूटने अल्पावधीतच विविध शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी काही विद्यार्थ्यांना आयटी कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

रोबोटिक्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी परिसरातील शाळांनी पुढाकार घेऊन टेकस्पेससोबत सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.

75
11839 views

Comment