logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भोंदूबाबा प्रकरण! अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याबद्दल कोपरगाव पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल.. मोबाईलमध्ये ते व्हिडीओ असतील तर लवकर डिलिट करा - पोलीस

कोल्हापूर : 26
प्रतिनिधी
पोलिसांना मदत करणे आवश्यक आहे, परंतु पीडित महिलांची ओळख उघड होऊ नये म्हणून अशा व्हिडिओंना व्हायरल करू नये. भोंदू बाबा आरोपी असलेल्या गुन्ह्यांमधील पीडित महिलांचे व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक खरात प्रकरणात ५८ हून अधिक आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आले आहेत . आता या व्हिडीओंबाबत पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात नाशिकमधील अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या भोंदू व नकली ज्योतिषाने अनेक महिलांवर, अल्पवयीन मुलीवर, गर्भवती महिलेवर देखील लैंगिक अत्याचार केले. खरातने त्याच्या कार्यालयात महिलांसोबत जे किळसवाणे कृत्य केले त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आता या विरोधात लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणातील पीडित महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पोलीस अॅक्शन मोडमध्ये आहेत. जर तुमच्या मोबाईलमध्ये ते व्हिडीओ असतील तर लवकर डिलिट करा.
कोपरगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरगाव येथील दोघांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुन्हा भारतीय न्याय संहितेच्या कलम २९४ (२), २९४ (३) (५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६७ (अ) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.
अशोक खरात प्रकरणात नाशिक पोलिसांनी अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे ५८ हून अधिक आक्षेपार्ह व्हिडीओ जप्त केले आहेत. या प्रकरणात आरोपी खरातला अटक करण्यात आली असून, तपास सुरू आहे. मात्र, या प्रकरणातील पीडित महिलांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्याने पीडितांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचे लक्षात आले. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे व तिसऱ्या आरोपीचा शोध असल्याचे पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्हा पोलिस प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, अशोक खरात प्रकरणातील कोणत्याही पीडित महिलांचे फोटो, व्हिडीओ किंवा त्यांची ओळख उघड करणारा कोणताही मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करू नये. असे काही केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, पीडितांच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि अशा प्रकारच्या आक्षेपार्ह कंटेंटला शेअर किंवा फॉरवर्ड करू नये. तसेच संबधित व्हिडीओ आपल्या मोबाईल ठेऊ नये.

9
663 views

Comment