logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बबुशा काळेची टोळी श्रीरामपूर अप्पर कार्यालयाने पकडली...

बबुशा काळेची टोळी श्रीरामपूर अप्पर कार्यालयाने पकडली...


श्रीरामपूर/अकोले (शिवप्रहार न्यूज नेटवर्क) दिनांक १९ मार्च २०२६ रोजी रात्री ०१/०० वा.चे सुमारास फिर्यादी सुरेखा माधव भोर,वय ३५ वर्ष,रा. धामणगव पाट,ता. अकोले जि. अहिल्यानगर यांचे राहते घरी फिर्यादी, फिर्यादीचे पती, सासु असे घरात झोपलेले असतांना कोणीतरी अनोळखी पाच इसमांनी त्यांचे घराचे दरवाजावर लाथ मारुन,दरवाजा उघडवुन आत प्रवेश करुन फिर्यादी व साक्षीदार यांना धक्काबुक्की करुन धमकावुन फिर्यादीचे गळयातील अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र त्यात सोन्याचे मणी व दोन सोन्याच्या वाटया,दिड ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे टॉप्स तसेच फिर्यादीचे सासुचे गळयातील अर्धा तोळा वजनाची सोन्याची पोत,अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे डोरले व १ विवो कंपनीचा मोबाईल असे एकुण १,१०,०००/- रु. किंमतीचा मुददेमाल काढुन घेवुन निघुन गेले आहे. याबाबत अकोले पोलीस स्टेशन गु.र.नं. १६५/२०२६ भा.न्या.सं. कलम ३१० (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान श्री.सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर यांनी सदर गुन्हयातील आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस आणणेकामी अपर पोलीस अधीक्षक कार्यालय,श्रीरामपूर येथील पथकातील तसेच अकोले पोलीस स्टेशनचे अधिकारी व अमंलदार यांचे संयुक्त पथक तयार करुन आदेशीत केले होते.या आदेशाप्रमाणे पथकाने सखोल व बारकाईने व्यावसायिक कौशल्यपुर्ण व गोपनीय तपास करुन तसेच तांत्रिक विश्लेषण करुन सदरचा गुन्हा बबुशा पिंग्या काळे रा.सुरेगाव ता.श्रीगोंदा याने त्याचे साथीदारांसह केल्याची निष्पन्न झाल्याने सदर आरोपींचा शोध घेत असताना सदर आरोपी हा त्याचे साथीदारांसह सुरेगाव,ता.श्रीगोंदा येथे लपुन बसला असल्याबाबत माहिती मिळाल्याने पथकाने सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन ०३ इसमांना जागीच पकडुन त्यांना पथकाने ओळख सांगुन त्यांचे नाव गाव विचारले असता १)बबुशा पिंग्या काळे,वय २२ वर्ष २)शुभम पिंग्या काळे,वय २० वर्ष ३)रवि लाला भोसले, वय ५० वर्ष,सर्व रा. सुरेगाव ता. श्रीगोंदा जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देवुन सदर गुन्हा आम्ही आमचे इतर दोन साथीदारांसह केला असल्याचे सांगितले आहे.तसेच सदर आरोपींनी अशाच प्रकारचे गुन्हे नाशिक व पुणे जिल्हयात केल्याचे कबुल केले असुन त्यापैकी दिंडोरी पोलीस स्टेशन येथील एक गुन्हा उघडकीस आला असल्याची माहिती मिळत आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे अकोले पोलीस स्टेशन हे करत आहे.
सदरची कारवाई ही श्री.सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री.सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर,यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.मोहन बोरसे, पोलीस निरीक्षक,अकोले पोलीस स्टेशन,अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपुर कार्यालयातील पो.स.ई.चारुदत्त खोंडे, पो.हे.कॉ. दादासाहेब लोंढे, पो.हे.कॉ. संतोष दरेकर, पो.हे.कॉ. सचिन धनाड, पो.हे.कॉ. संदीप दरंदले, पो.ना.रामेश्वर वेताळ,पो.कॉ. अशोक गाढे, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे,पो.कॉ. सहदेव चव्हाण तसेच अकोले पोलीस स्टेशनचे पो.स.ई. विनोद खांडबहाले, पो.हे.कॉ. रविंद्र वाघचौरे, पो.कॉ. अविनाश गोडगे, पो.कॉ. सुहास गोरे, पो.कॉ. मनोहर मोरे यांनी केली आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

2
288 views

Comment