logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नाशिक पेट्रोल डिझेल तुटवड्याच्या अफवेमुळे पेट्रोल पंपावर तोबा गर्दी

नाशिक आणि महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल तुटवड्याची बातमी पूर्णपणे अफवा असून, इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे, असे प्रशासन आणि भारत पेट्रोलियमने स्पष्ट केले आहे .अफवेमुळे अनावश्यक गर्दी होऊन पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता गरज असेल तेवढेच इंधन भरावे

महत्त्वाचे मुद्दे:

अफवा: पेट्रोल-डिझेल संपणार असल्याच्या सोशल मीडियावरील अफवेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली होती

सुरळीत पुरवठा: प्रशासनाने स्पष्ट केले आहे की इंधनाचा साठा पुरेसा आहे आणि पुरवठा सुरळीत आहे

गर्दी: इंधन टंचाईच्या भीतीने नागरिकांनी पंपांवर हांडे, कॅन घेऊन गर्दी केली

अवाहन: पेट्रोल वितरकांनी आणि प्रशासनाने घाबरून न जाण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे

आखाती युद्ध: आखाती युद्धामुळे इंधन टंचाईच्या अफवा पसरल्या होत्या,

त्यामुळे, घाबरून न जाता संयम राखणे गरजेचे आहे.

40
754 views

Comment