मंगल कार्यालयात नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला जन्मठेप...
मंगल कार्यालयात नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला जन्मठेप...
अहिल्यानगर (शिवप्रहार न्यूज)- अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला विशेष पोक्सो न्यायाधीश डॉ. यू. जे. मोरे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. युसुफ हमीद कुरेशी (वय ३४), रा.गाझीनगर, काटवन खंडोबा, अहिल्यानगर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली दोषी ठरवत शिक्षा ठोठावली असून,एकूण २२ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही दंडाची रक्कम पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,ऑगस्ट २०१५ मध्ये पीडिता तिच्या घराजवळ खेळत असताना आरोपीने तिला खाऊचे आमिष दाखवून अहिल्यानगर येथील एका मंगल कार्यालयात नेले व तिच्यावर अत्याचार केला.त्या वेळी आरोपी तेथे पहारेकरी म्हणून कार्यरत होता.घटनेनंतर दुसऱ्या दिवशी पीडितेच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला विशेष पोक्सो न्यायालय तसेच जिल्हा न्यायाधीश कोर्ट क्रमांक ०६ येथे चालला. या प्रकरणात एकूण १८ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडिता, तिची आई, वैद्यकीय अधिकारी व रासायनिक विश्लेषक यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. निकाल देताना न्यायालयाने नमूद केले की,पीडित मुलीचा जन्म १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी झाला असून, प्रत्येक बालिकेला सुरक्षित, निर्भयपणे जगण्याचा व खेळण्याचा अधिकार आहे. मात्र आरोपीच्या कृत्यामुळे तिचे हे स्वातंत्र्य व सुरक्षिततेची भावना हिरावली गेली.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. राजेश आर. त्रिमुखे यांनी काम पाहिले. त्यांना सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, अंमलदार आर.डी.आडसूळ,याकुब सय्यद, सचिन डमाळे यांनी साहाय्य केले.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015