logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जि. प. प्राथमिक शाळा खमारी येथे केंद्रप्रमुखांनी केली शाळा तपासणी व भेट

जि. प. प्राथमिक शाळा खमारी येथे केंद्रप्रमुखांनी केली शाळा तपासणी व भेट

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- कारधा केंद्रातंर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खमारी (बु.) येथे कारधा केंद्राचे केंद्रप्रमुख दुर्गाप्रसाद शेंडे व केंद्र मुख्याध्यापक ओम वाघाये यांनी शाळेला भेट देऊन शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाची सविस्तर तपासणी केली.
त्यात ​शिस्तबद्ध स्कॉलरशिप परीक्षा, भेटीदरम्यान शाळेत ४ थी चे स्कॉलरशिप सराव पेपर सुरू होते. दोन्ही अधिकाऱ्यांनी वर्गात प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि परीक्षेच्या नियोजनाची प्रशंसा केली.
त्यादरम्यान ​शैक्षणिक गुणवत्तेची पाहणी करून शाळेतील दप्तर तपासणी, पोषण आहार आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. ​समाधान व्यक्त शाळेचे प्रसन्न वातावरण, सुसज्ज कार्यालय आणि नियोजित शैक्षणिक कामकाज पाहून केंद्रप्रमुख दुर्गाप्रसाद शेंडे व ओम वाघाये यांनी समाधान व्यक्त करत संपूर्ण शालेय चमूचे कौतुक केले.
​याप्रसंगी शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका गीता मोटघरे यांच्यासह सर्व सहाय्यक शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. मुख्याध्यापिकेच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी शाळेच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अधिकाऱ्यांनी विशेष गौरव केला.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment