logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बीड मध्ये बॉम्बच्या अफवेने खळबळ

बीड, महाराष्ट्र | प्रतिनिधी
बीड शहरातील पोस्ट ऑफिसला ई-मेलद्वारे बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक संदेशानंतर पोलिस प्रशासन आणि बॉम्ब शोध पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
संशयास्पद पार्सलच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोस्ट ऑफिसमधील सर्व कर्मचारी व नागरिकांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. परिसर सील करण्यात आला असून सखोल तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही माहिती ई-मेलद्वारे देण्यात आली असून त्यामागील व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुढील तपास सुरू असून अद्याप कोणतीही स्फोटक सामग्री आढळून आलेली नाही.

143
6232 views

Comment