logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जनता विद्यालयात शहीद दिन उत्साहात साजरा


पिंपळगाव सराई, दि. २३ मार्च २०२६

जनता विद्यालय, पिंपळगाव सराई येथे शहीद दिन अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेदांत घोलप होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्रगती शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे व पर्यवेक्षक संजय पिवटे यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. उपस्थितांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांना अभिवादन केले.

प्रमुख वक्त्या प्रगती शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "देशासाठी हसत-हसत फाशी चढणारे भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या अमर बलिदानाला आज आम्ही नमन करतो." त्यांनी विद्यार्थ्यांना देशभक्तीची जाणीव ठेवून समाजासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात वेदांत घोलप म्हणाले, "शहीदांच्या त्यागामुळे मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत ओळखून, आपणही राष्ट्रसेवेसाठी सज्ज राहू या." त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत झाली.

कार्यक्रमाचे समन्वयक नितीन शेळके यांनी नियोजन केले होते. सूत्रसंचालन समृद्धी देशमाने व समृद्धी खबुतरे यांनी सुरेखरीत्या पार पाडले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रियंका सोनुने यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली असून, शहीदांच्या बलिदानाची जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला.

18
1094 views

Comment