logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जलसंवर्धन व सामाजिक समतेचा प्रभावी संदेश जे. एम. पटेल महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न

जलसंवर्धन व सामाजिक समतेचा प्रभावी संदेश
जे. एम. पटेल महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न

विलास केजरकर भंडारा.

भंडारा : जागतिक जलदिनाच्या निमित्ताने जे. एम. पटेल महाविद्यालयात “वॉटर अँड जेंडर : व्हेअर वॉटर फ्लोज, इक्वॅलिटी ग्रोज” या विषयावर पोस्टर स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन ग्रीन क्लबतर्फे करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. प्रदीप मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी समितीचे समन्वयक डॉ. कार्तिक पनिक्कर, परीक्षक म्हणून डॉ. शिरीष नखाते, डॉ. श्याम डफरे व डॉ. अपर्णा यादव तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. संगीता कटरे उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करतांना डॉ. मेश्राम यांनी पाण्याचे बहुआयामी महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले की, पाणी हे केवळ जीवनावश्यक साधन नसून सामाजिक समतेचा आधारस्तंभ आहे. विशेषतः महिलांच्या सशक्तीकरणात तसेच ग्रामीण विकासात पाण्याची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून विद्यार्थ्यांनी जलसंवर्धनाबाबत सजग व उत्तरदायी भूमिका घ्यावी असे त्यांनी आवाहन केले.
स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. “पाणी आणि लिंग समानता” या विषयावर विद्यार्थ्यांनी सर्जनशील, आशयघन व विचारप्रवर्तक पोस्टर्स सादर करून जलसंवर्धनाचे महत्त्व आणि सामाजिक समतेशी त्याचा परस्परसंबंध प्रभावीपणे मांडला. स्पर्धेत कु. अर्पिता एल. जनबंधु यांनी प्रथम, कु. अनुश्का पी. नंदागवळी यांनी द्वितीय, तर कु. अदिती धात्रक यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नयना सोनवणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. कौशिक कटरे यांनी मानले.
सदर उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रीन क्लबच्या सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले. यामध्ये डॉ. विशाखा वाघ, प्रा. अमोल सातपुते, डॉ. प्रताप पटले, डॉ. प्रतिभा पालीवाल, डॉ. कौशिक कटरे, डॉ. भावना राय तसेच प्रा. वैशाली लोणकर यांचा समावेश होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धनाबाबत जागरूकता वृद्धिंगत झाली असून “पाणी आणि समानता” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचण्यास मदत झाली.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

4
256 views

Comment