logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पीक कर्ज परतफेडीसाठी ३१ मार्चची मुदत भंडारा जिल्हा बँकेचे शेतकरी सभासदांना जाहीर आवाहन

पीक कर्ज परतफेडीसाठी ३१ मार्चची मुदत
भंडारा जिल्हा बँकेचे शेतकरी सभासदांना जाहीर आवाहन

विलास केजरकर भंडारा.

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सेवा सहकारी संस्थांच्या सर्व शेतकरी सभासदांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी आपल्या खरीप पीक कर्जाचा भरणा करावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केले आहे. वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील आर्थिक वर्षात नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभही घेता येणार आहे.

*राजमाता अहिल्यादेवी होळकर कर्ज मुक्ती योजनेचा लाभ मिळवा*

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या परमपूज्य राजमाता अहिल्यादेवी होळकर कर्ज मुक्ती मुक्ती योजनेअंतर्गत विविध सवलती आणि लाभ जाहीर केले आहेत. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी चालू कर्जाची परतफेड ३१ मार्चपर्यंत करणे अनिवार्य आहे. जे शेतकरी या मुदतीत आपल्या कर्जाचा भरणा करतील तेच या योजनेसाठी पात्र ठरतील असे बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

*सुट्यांमुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी तातडीने पावले उचला*

यंदा मार्च २०२६ मध्ये दरवर्षीच्या तुलनेत सार्वजनिक सुट्टयांचे प्रमाण जास्त आहे. यामुळे महिण्याच्या शेवटच्या दिवसांत बँकेच्या शाखांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही गर्दी टाळण्यासाठी आणि शेवटच्या क्षणाची घाई होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी शक्य तितक्या लवकर आपला कर्ज भरणा पूर्ण करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

*बँकेची सेवा तत्पर*

शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या पूर्ण क्षमतेसह सेवा देण्यासाठी सज्ज आहे. सुट्या आणि संभाव्य गर्दी लक्षात घेऊन बँकेने योग्य नियोजन केले असून, शेतकरी सभासदांना कोणतीही अडचण येऊ नये याकरिता कर्मचारी तत्पर राहणार आहेत.

शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाचा भरणा करून स्वतःला पुढील वर्षाच्या कर्जासाठी पात्र करावे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. बँकेला व सेवा सहकारी संस्थेला सहकार्य करून जिल्ह्याच्या कृषी अर्थचक्राला बळ द्यावे.'

*सुनील फुंडे, अध्यक्ष, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक*

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

1
375 views

Comment