logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कक्कय्या समाज सार्वजनिक गणेशोत्सव धारावी आयोजित मोफत वधू-वर परिचय मेळावा संपन्न!

कक्कय्या समाज सार्वजनिक गणेशोत्सव धारावी आयोजित मोफत वधू-वर परिचय मेळावा संपन्न!

मुंबई :(दत्ता खंदारे /प्रतिनिधी )

कक्कय्या समाज सार्वजनिक गणेशोत्सव धारावी यांच्या वतीने सायन येथील डि. एस हायस्कूल मध्ये मोफत वधू -वर परिचय मेळावा दिनांक २१ मार्च २०२६ रोजी आयोजित केला होता.यावेळी सौ अर्चनाताई शिंदे (नगरसेविका ), श्री ना. म शिंदे (जेष्ठ साहित्यिक ), शिवलिंग व्हटकर (अध्यक्ष संत कक्कय्या समाज विकास संस्था धारावी ), राम कोकणे (अध्यक्ष समस्त कक्कय्या समाज महासंघ मुंबई ), महादेव शिंदे (अध्यक्ष वीर शैव कक्कय्या कल्याण मंडळ ),सौ. कांता तपासे (अध्यक्ष डोंबिवली मंडळ ),अशोक पाटेकर (सचिव वीर शैव कल्याण समाज मंडळ वेरूळ ), संदीप कळंबे (निवृत्त उपजिल्हाअधिकारी मुबंई ), शशिकांत सोनवणे(प्रवक्ता समस्त कक्कय्या समाज महासंघ )यांच्या उपस्थित हा वधू -वर परिचय मेळावा उदंड प्रतिसादात संपन्न झाला. यावेळी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
वधू -वरांना एकाच व्यासपीठावर आणून त्याच्या अपेक्षा काय आहेत याची माहिती मिळते.शिवाय लग्न जुळवतना वधू आणि वरांच्या घरच्या मंडळींना वधू वरांच्या अपेक्षा काय आहेत याची माहिती अगोदरच कळल्यामुळे कुठलीच अडचण निर्माण होत नाही.
भावी वधूवर निवडतांना जास्त अपेक्षा करणे व्यर्थ. त्यापेक्षा माणसं कशी आहेत, हेच पाहणे महत्त्वाचे. वाढत्या कौटुंबिक गरजा, त्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने ताणतणाव कौटुंबिक दुराव्यामुळे वधूवर पालक परिचय मेळावा ठिकठिकाणी आयोजित होणे आता आवश्यक बाब बनली आहे. त्यामुळे कक्कय्या समाज सार्वजनिक गणेशोत्सव धारावी यांनी पुढाकार घेऊन संत कक्कय्या समाजाचा वधू-वर परिचय मेळावा यशस्वीरित्या पार पाडला. यावेळी ३००हून अधिक नवोदित वधू वरांनी आपली नाव नोंदणी करुन आपला परिचय दिला.
कक्कय्या समाज सार्वजनिक गणेशोत्सव धारावी यांनी आयोजित केलेल्या या वधू वर परिचय मेळाव्यासाठी मुख्य मार्गदर्शक विजय पोळ,कार्याध्यक्ष मनोहर सोनवणे,अध्यक्ष हेमंत व्हटकर, सचिव मसाजी होटकर,उपाध्यक्ष गिरीराज शेरखाने, उप सचिव मंगेश खरटमल,अ. हि.तपासणीस परशुराम खंदारे,उपाध्यक्ष विश्वनाथ शिंदे,उपाध्यक्ष किरण व्हटकर, खजिनदार विजय शिंदे उपखजिनदार बाबुराव कावळे,वित्तीय सल्लगार सुनिल पोळ, तसेच मंडळाचे सदस्य गौतम व्हटकर, मछिंद्र कदम, वामन पोळ, सुनिल व्हटकर,गंगा जोगधनकर, सुनिता सोनटक्के,माधुरी गायकवाड, सुरेखा व्हटकर, अनुष्का शिंदे, संगिता होटकर, लक्ष्मी पोळ,प्रमिला सोनावणे इत्यादी सभासदांनी विशेष मेहनत घेऊन वधू वर परिचय मेळावा पार पाडला. यावेळी समाजातील विविध मान्यवर मंडळींनी उपस्थित राहून कक्कय्या समाज सार्वजनिक गणेशोत्सव धारावी यांच्या कार्याचा गौरव केला.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

14
1888 views

Comment