logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शिवपानणंद रस्ता बनवण्याच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास! की खनिज तस्करी!

रामदास ढोरमले
(Aima) वार्ताहर जातेगांव, ता. पारनेर
अहिल्यानगर!
महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी योजनेतर्गत महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची शिव पानणंद रस्ता ही योजना आणली आहे. परंतु गावातील काही मंडळी ने आपल्या स्वार्थासाठी काही व्यवसयिकांना हाताशी धरून अक्षरशः निसर्गाचा अगदी ऱ्हास चालवला चालवला आहे. त्याचे एक उदाहरण जातेगांव व राळेगण सिद्धी यांचे शिव रस्ता! आता काम चालू आहे जातेगांव वरून राळेगण ला जाणाऱ्या रस्त्यावर कोहिनी जवळ असलेल्या गट नंबर 313 या क्षेत्रामध्ये असलेला डोंगर दुतरफा फोडून जवळजवळ पंधरा ते वीस फूट खोल खोदून असलेल्या निसर्ग सौंदर्य पूर्णपणे संपवलेले आहे. त्याचबरोबर त्यामधून निघणारे (खनिज) पाषाण फोडून ते खाण व्यवसायिकानां परस्पर विकले जात आहे. तरी यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यावर योग्य ती कारवाई तहसीलदार किंवा तत्सम अधिकारी करावी अशी काही शेतकऱ्यांनी विनंती केली आहे.

0
35 views

Comment