मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना मारहाण
चंद्रपूर : मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तसेच त्यांच्या संरक्षणासाठी विविध मागण्यांसह मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनामध्ये BLO कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने —
• जनतेमध्ये व्यापक जनजागृती करणे
• BLO यांना अधिकृत ओळखपत्र देणे
• आवश्यक त्या ठिकाणी पोलीस सुरक्षा पुरविणे
• तसेच दोषींवर कडक कारवाई करणे
या प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या.
सदर निवेदन देताना माजी शिक्षक आमदार नागो गाणार, तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून प्रशासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, चंद्रपूर यांनी केली आहे.
—