पालखी भोवी समाजाची ऐतिहासिक एकमेव देवीचे शक्तीपीठ श्री बाल बंगारअम्मा देवस्थान
पालखी भोवी समाजाची ऐतिहासिक एकमेव देवीचे शक्तीपीठ श्री बाल बंगारअम्मा देवस्थान
कलबुर्गी:
श्री बाल बंगारअम्मादेवी
ही पालखी भोवी समाजाची कुलदेवता व देवीचे शक्तीपीठ आहे व श्री दुर्गा देवीचे अवतार असल्याचे सांगतात.
समाजात अधर्म वाढला किंवा भक्त संकटात सापडले तर तेव्हा त्यांच्या रक्षणा करिता देवीने बालिकेच्या रूपात अवतार धारण करून समाजाचे रक्षण केलं संकटकाळी पाठीशी उभी राहणारी ती "आई" असल्याचे समाज बांधव सांगतात.
श्री बाल बंगारअम्मादेवी चे देवस्थान
कलबुर्गी शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठ स्थित असून घर आणि व्यापार दुकानांनी
वेढलेले आहे. सराफ बाजार जवळच्या परिसरात आहे
हे देवस्थान तीन पिढ्यांचा म्हणजे ३०० वर्षे जुने आहे.
देवस्थानाचे जीर्णोद्धार ४० वर्षा खाली झाले आहे.भक्तांच्या सोईसाठी व कार्यक्रमा करिता जागा घेतली आहे देवस्थानाचा विकास व इतर कामांना करिता समाज संघटना प्रयत्नशील आहे असे समाज प्रमुखांनी सांगितले.
श्री बाल बंगारअम्मादेवी पालखी भोवी समाजाचे हे धार्मिक स्थळ आणि सामाजिक न्यायालयाचे केंद्र आहे.
भोवी समाजातील कोणतेही अंतर्गत वाद, कौटुंबिक कलह किंवा सामाजिक समस्या उद्भवल्यास, समाजातील ज्येष्ठ मंडळींच्या उपस्थितीत देवीच्या सानिध्यात
बसून पंचायत भरवून न्याय देण्याची परंपरा आहे. या देवीला साक्ष मानून
'पंचायती' मध्ये जो निर्णय घेतला जातो, तो संपूर्ण समाजाला मान्य असतो. समाजातील एकजूट आणि शिस्त टिकून रहावे याचे मागचे उद्दिष्ट आहे.
देवी मूर्ती:
मुख्य देवस्थाना मध्ये एकूण ४ मुर्त्याआहेत
पहिल्या दोन देवीच्या मुर्त्या ह्या श्री बंगारअम्मा देवीच्या आहेत त्या पाषाणाच्या आहेत तर चौथ्या देवीच्या मूर्तीची प्रतिकृती ही तिसरी देवीची मूर्ती आहे ती शमीच्या(बन्नी) झाडाच्या लाकडा पासून तीन वर्षातून एकदा बनवली जाते.तीच मुख्य देवता "श्री बाल बंगारअम्मादेवी"
चौथी मूर्ती पाषाणाची असून ती उंच श्री बाल बंगारअम्मादेवी ची मूर्ती आहे.
यातील तीन मुर्त्या अगोदर प्रतिष्ठापना केलेल्या आहेत.
मंदिर परिसरात जुन्या मूर्तींचे एक छोटे
मंदिर आहे. नागदेव यांना दगडावर कोरलेल्या तीन चार मुर्त्या आहेत हे देवस्थान परिसरात पाहण्यास मिळते.
उत्सव व धार्मिक परंपरा:
दर मंगळवार आणि शुक्रवारी सामान्य रित्या पूजा केली जाते, नवरात्र उत्सव साधेपणाने साजरा होतो.
या श्री बाल बंगारअम्मादेवी मंदिरात आषाढ महिना महत्वाचा आहे.
प्राचीन परंपरे प्रमाणे या
शक्ती देवीला प्राचीन काळा पासून आषाढ महिन्यात विशेष महत्त्व प्राप्त असून या काळात विशेष पूजा केली जाते. या देवीला नैवेद्य आणि बळी अर्पण करण्याची प्रथा आहे. या कष्टकरी पालखी भोवी समाज पावसाळ्याच्या सुरुवातीला समाजात सुख-समृद्धी रहावी आरोग्य चांगले राहावे यासाठी देवीकडे साकडे टाकतो व आपले मनोकामना पूर्ण करून घेतो.
आषाढ महिन्यातील
नेवैद्य असलेले बुट्टी( टोपले )घेऊन शहरातून एक पवित्र फेरी घालण्याची परंपरा आहे. याला बुट्टी यात्रा म्हणून ओळखले जाते.
दर वर्षी चैत्र महिन्यात जत्रा भरते तसेच तीन वर्षातून एकदा विशेष जत्रा भरवली जाते
यावेळीची जत्रा २७ मार्च रोजी होणार आहे.
*देवी प्रत्यक्ष झाल्याचा इतिहास:
विजयनगरसाम्राज्या नंतरचा काळ हा अवघड बनला होता
राजांची पालखी वाहण्या सोबत व युद्धभूमीवर आपले पराक्रम गाजवणारा ह्या समाजाला काही काळ अडचणींना सामोरे जावे लागले होते ते कलबुर्गी परिसरात स्थलांतरित झाले. नंतर समाज बांधवांनी
एकत्र येऊन छोट्या देवी मंदिराची स्थापना करून देवी ची उपसना केली असे समाज बांधव सांगतात.
मंदिर स्थापना करण्या मागचा इतिहास रोचक आहे. एका पुराणातील संदर्भ देत
दक्ष प्रजापती यांची मुलगी बालिका बनून देवीच्या अवतारात आली या देवीने समाजाचे रक्षण केले असे समाजाचे वरिष्ठ मंडळी सांगतात.
बालिका अवतार रूप आहे ही देवी
"श्री बाल बंगारअम्मा देवी"
या नावने देवी ओळखली जावू लागली.
देवी चे हेच स्वरूप हे कलबुर्गी येथील देवस्थांतील मूर्ती वरून
"श्री बाल बंगारअम्मा" देवस्थान आहे
याचा मौखिक इतिहासा वरून स्पष्ट होते असे या समाजाच्या जाणकारांनी व्यक्त केले.
"श्री बाल बंगारअम्मा" बाबतचे
पुढील काही घडामोडींचा तपशील पाहता
"श्री बाल बंगारअम्मा"
देवी ही विश्वकर्मा समाजाची मुलगी,
ही देवी अवतारात
ज्या घरातून आली ते बडीगेर(सुतार) घराणे आज ही आहे हे घर याच शहरातील जगत वस्ती परिसरात आहे.
विश्वकर्मा बडीगेर कुटुंबीय तीन पिढ्यांनी राहत आहेत दुसऱ्या पिढीतील चिंतामणी बडीगेर. त्यांची देवीची सेवा अनेक वर्षे घडली आहे त्यांच्या निधना नंतर हे काम गेल्या ४० वर्षांपासून त्यांचे हे काम त्यांचा मुलगा श्री कल्याणी चिंतामणी बडीगेर(वय७२)हे करत आहेत. शमीच्या ( बन्नी )झाडाच्या लाकडा पासून सुंदर
मूर्तीला(बाहुली)आकार देण्याचे काम ते करत आहेत. देवीची साकारलेली मूर्तीला एक दिवस विधिवत पूजा अर्चा उरकून धार्मिकबडीगेर कुटुंबीय ती मूर्ती
पालखी भोवी समाज प्रमुख वरिष्ठ मंडळींना सोपवतात.नंतर गंगास्थळ(विहीर) येथून पवित्र पाणी आणून, ढोल-ताशांच्या गजरात सुवासिनी डोक्यावर कुंभ घेऊन मिरवणुकीत सहभागी होतात
देवीची मूर्ती ची मिरवणूक देवस्थाना कडे प्रस्थान होते
नंतर विधिवत देवी मूर्तीला अलंकृत करून देवी मूर्तीची प्रतिष्ठापाना केली जाते परंपरा आज ही कायम आहे.
विश्वकर्मा आणि पालखी भोवी समाज यांच्यातील समाजात एक सौहार्दाचे प्रतीक असल्याचे मानले जाते.
अजून एक विशेषता येथे दिसून येते ते की
प्रतिष्ठित आर्य वैश्य समाजात एखादे लग्न शुभकार्य घरात होत असेल तर ते सुरुवात करण्या अगोदर श्री बाल बंगारअम्मा देवीला पूजा, तेल लावून इतर विधी उरकूनच ते आपल्या घरी जाऊन पुढच्या लग्न शुभ कार्याला चालना देतात
या लेखातील महत्व पूर्ण विषय, माहिती मौखिक इतिहास याची सांगड या समाजाचे जेष्ठ व्यक्तिमत्व असलेले
श्री. लक्ष्मीकांत एन. मनोकर, श्री. शंकर राव पुरंकर , श्री. बाबुराव यरस्कर सह इतर समाज सदस्या कडून मिळालेली आहे. देवीचा हा देदीप्यमान इतिहास इतर काही धार्मिक विषय आजच्या युवा पिढीपर्यंत पोहचावी तसेच कलबुर्गी जनते माहिती व्हावी अशी आमची इच्छा आहे असे पण त्यांनी यावेळी सांगितले.
पालखी भोवी समाजाची जिल्हास्तरीय संघटना कर्नाटक राज्य सरकार नोंदीत असून देवस्थान तसेच इतर सामाजिक कार्यक्रम चालवले जाते तसेच या समाजाची राज्यस्तरीय संघटना राज्यात कार्यरत आहे
*****
###लेखन आनंदकुमार नाखरे