logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नांदेड:*लायनोत्सवअंतर्गतरिजनचेअरपर्सनला.गंगाबिशनकांकरयांच्यापुढाकारातूनआयोजितलायन्सरिजनकॉन्फरन्समध्येधर्मभूषणॲडदिलीपठाकूरयांनाबेस्ट लॉयन ऑफ द रीजन’पुर


नांदेड : *लायनोत्सव अंतर्गत रिजन चेअरपर्सन ला. गंगाबिशन कांकर यांच्या पुढाकारातून आयोजित लायन्स रिजन कॉन्फरन्समध्ये धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना ‘बेस्ट लॉयन ऑफ द रीजन’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानासह त्यांच्या पुरस्कारांची एकूण संख्या तब्बल ११० वर पोहोचली आहे. तसेच लायन्स क्लब नांदेड सेंट्रलला विविध विभागांमध्ये एकूण १४ पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे सर्वत्र त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.*

या प्रतिष्ठेच्या कॉन्फरन्समध्ये सर्वाधिक चुरशीची ठरलेली बॅनर प्रेझेंटेशन स्पर्धा पुन्हा एकदा नांदेड सेंट्रलने जिंकली. ‘कायापालट’ या सामाजिक उपक्रमाची प्रभावी मांडणी करणाऱ्या स्लोगनमुळे क्लबने प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, या स्पर्धेत सलग आठव्या वर्षी प्रथम पारितोषिक मिळविण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे.

कन्व्हेनर म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शिवकांत शिंदे यांना ‘बेस्ट कन्व्हेनर ऍप्रिसिएशन अवॉर्ड’सह एकूण तीन पुरस्कार मिळाले. क्लबचे अध्यक्ष डॉ. अमोल हिंगमिरे यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘कायापालट’ व ‘लायन्सचा डब्बा’ या कायमस्वरूपी प्रकल्पांमुळे लायन्स सेंट्रलला लायन्स इंटरनॅशनलच्या ग्लोबल सर्व्हिस टीम, लायन्स क्वेस्ट इन इंडिया फाउंडेशन अप्रिसिएशन अवॉर्ड आणि ‘हंगर’ या उपक्रमांतर्गत विविध पुरस्कार मिळून एकूण १४ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

या यशामागे उमेश मेगदे, शिवाजीराव पाटील, गौरव दंडवते, प्रवीण जोशी, जयश्री ठाकूर, स्वाती मेगदे, अभिता शिंदे, गौरी पाटील आणि डॉ. रश्मी हिंगमिरे यांचे मोलाचे योगदान राहिले.

हॉटेल सिटी सिम्फनी येथे रविवारी आयोजित या कॉन्फरन्सचे उद्घाटन प्रांतपाल अश्विनकुमारजी बजोरिया यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून पूर्व प्रांतपाल गिरीश सिसोदिया, उपप्रांतपाल राहुल औसेकर व योगेश जायस्वाल, तसेच पूर्व प्रांतपाल दिलीप मोदी, जयेश ठक्कर, ॲड. प्रवीण अग्रवाल आणि नारायणदास कलंत्री उपस्थित होते. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात सर्व सदस्यांचे होळीच्या गाठींच्या माळा घालून आणि पंचामृत देऊन स्वागत करण्यात आले.

कॉन्फरन्सचे अध्यक्षस्थान ला. गंगाबिशन कांकर यांनी भूषविले, तर कन्व्हेनर शिवकांत शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख वक्ते म्हणून ला. राजभाई मुचल (आयडी एंडोर्सी, एमडी-३२३४) यांनी आपल्या प्रभावी भाषणातून यशस्वी जीवनाचे मार्गदर्शन केले. यानंतर मान्यवरांची समर्पक भाषणे झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय भारतीया आणि मिली मोदी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झोन चेअरपर्सन ला. ओमप्रकाश मानधने (झोन १ – नांदेड), ला. नीलम कासलीवाल (झोन २ – नांदेड), ला. अवि टाक (झोन ३ – परभणी) आणि ला. पंडित बर्डाले (झोन ४ – परभणी), तसेच शिवकांत शिंदे, प्रा. रवी शामराज, पारूल जैन व सर्व क्लबचे पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.

सुयोग्य नियोजन, दर्जेदार मनोरंजन आणि उत्कृष्ट भोजन व्यवस्थेमुळे या कॉन्फरन्सचे आयोजन विशेष ठरले. रिजन चेअरपर्सन गंगाबिशन कांकर यांच्या नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होत असून, लायन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या या यशाबद्दल लायन्स परिवारातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

9
731 views

Comment