logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी पुस्तकांचे दर परवडणारे हवेत

वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी पुस्तकांचे दर परवडणारे हवेत

अलीकडे ठाणे येथील पुस्तक प्रदर्शनाला भेट देण्याचा योग आला आणि तेथे एक आनंददायी व आश्वासक चित्र पाहायला मिळाले. ज्येष्ठ नागरिकांसह युवा पिढीची लक्षवेधी उपस्थिती विशेष समाधान देणारी होती. आजकाल वाचनाची सवय कमी झाली आहे किंवा लोकांनी पुस्तकांकडे पाठ फिरवली आहे, असा जो सर्वसाधारण समज आहे, तो काही अंशी चुकीचा असल्याचे प्रकर्षाने जाणवले.

प्रदर्शनामध्ये तरुण वाचक गटागटाने पुस्तकांवर चर्चा करताना, आपापले विचार मांडताना दिसत होते. अनेक जण पुस्तक चाळत असताना त्यातील आशयावर मनोगत व्यक्त करत होते. काहीजण लेखक, विषय आणि साहित्यप्रकार यांची तुलना करताना दिसले, तर काही जण नव्या पुस्तकांची यादी तयार करत होते. हे दृश्य खरोखरच प्रेरणादायी होते. यावरून स्पष्ट होते की, वाचक आजही आहेत आणि त्यांच्यात वाचनाची आवडही तितकीच जिवंत आहे.

युवा पिढीमध्ये ज्ञानाची ओढ आणि नवीन विषय समजून घेण्याची उत्सुकता आहे, हे या प्रदर्शनातून स्पष्टपणे दिसून आले. स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्त्व विकास, कादंबऱ्या, आत्मचरित्रे, विज्ञान, इतिहास अशा विविध विषयांवरील पुस्तकांकडे त्यांचा ओढा दिसून आला. त्यामुळे वाचन संस्कृती संपत चालली आहे, हा समज पूर्णपणे चुकीचा ठरतो.

मात्र, या सकारात्मक चित्रासोबत एक वास्तवही नाकारता येत नाही. सर्वसामान्य वाचकांची आर्थिक क्षमता आणि पुस्तकांच्या वाढत्या किमती यामध्ये ताळमेळ बसत नाही. आज अनेक दर्जेदार पुस्तके शेकडो रुपयांच्या घरात उपलब्ध आहेत. मध्यमवर्गीय आणि विद्यार्थ्यांसाठी ही किंमत परवडणारी नसते. अनेकांना स्वतःचा पुस्तकसंग्रह असावा, घरात छोटेखानी वाचनालय असावे, असे वाटते; परंतु पुस्तकांच्या वाढत्या किंमतीमुळे ही इच्छा अपुरीच राहते.

विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना या परिस्थितीचा अधिक फटका बसतो. त्यांना वाचनाची आवड असूनही आवश्यक पुस्तके विकत घेणे कठीण जाते. परिणामी, त्यांची ज्ञानप्राप्ती मर्यादित राहण्याची शक्यता निर्माण होते.

यावर उपाय म्हणून पुस्तक प्रकाशक, विक्रेते आणि शासन यांनी एकत्रितपणे पुढाकार घेणे आवश्यक आहे. पुस्तकांवर सवलती देणे, मोठ्या प्रमाणावर विक्री करून दर कमी ठेवणे, अनुदानित पुस्तक योजना राबविणे, तसेच जिल्हा आणि तालुका स्तरावर सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या व गुणवत्ता वाढविणे यांसारखे उपाय प्रभावी ठरू शकतात. याशिवाय ‘बुक बँक’ संकल्पना अधिक बळकट करणे, शाळा व महाविद्यालयांमध्ये पुस्तक शेअरिंग उपक्रम राबविणे इत्यादी.

वाचन ही केवळ छंदाची गोष्ट नसून ती व्यक्तिमत्त्व विकासाची, विचारशक्ती वाढविण्याची आणि समाज प्रबोधनाची महत्त्वाची कडी आहे. वाचनामुळे व्यक्ती अधिक संवेदनशील, विचारशील आणि जागरूक बनते. त्यामुळे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वाचन संस्कृती बळकट करणे अत्यावश्यक आहे.

त्यासाठी पुस्तकांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे असणे ही काळाची गरज आहे. शासन, प्रकाशक आणि समाज या तिन्ही घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास वाचन संस्कृतीला नवसंजीवनी मिळेल. अशा उपक्रमांमुळे “वाचेल तो वाचेल” हा संदेश केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्षात उतरलेला दिसेल.

— विश्वनाथ पंडित, ठाणे

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment