तळोद्यात साडेसात लाखांचा गुटखा जप्त
तळोदा : बेकायदेशीरपणे दारू व
प्रतिबंधित पानमसाल्याची वाहतूक करणाऱ्या टोळीवर तळोदा पोलिसांनी कारवाई केली असून याप्रकरणी एकास अटक केली आहे. या कारवाईत ७ लाख ५८ हजार ५९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नटवर दामजी वसावे, रा. काकरपाटी, ता. धडगाव याला ताब्यात घेण्यात आले आहे. १८ मार्च रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास शहादा रोडवरील भन्साली प्लाझा समोर ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात दारू, बिअर, पानमसाला, तंबाखू व वाहन असून एकूण किंमत सात लाख ५८ हजार रुपये आहे.