logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मनरेगा मजुरी प्रलंबित; मुख्यमंत्री सचिवालयाची दखल, संबंधित विभागाकडे प्रकरण पाठविले...

मार्च महिना संपत आला तरीही मनरेगा मजुरांचे पैसे जमा नाहीत; शासनाच्या कार्यवाहीकडे मजुरांचे लक्ष
अहिल्यानगर : मनरेगा (रोजगार हमी योजना) अंतर्गत १०० दिवसांवरील मंजूर मजुरी अद्यापही मजुरांच्या खात्यात जमा झालेली नसल्यामुळे राज्यातील कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मार्च महिना संपत आला तरीही प्रलंबित मजुरी न मिळाल्याने अनेक मजूर आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
या संदर्भात शासनाकडे करण्यात आलेल्या तक्रारीची मुख्यमंत्री सचिवालयाने दखल घेत प्रकरण संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविले आहे. तक्रार क्र. COM/PLEG/2026/104 द्वारे मजुरांच्या प्रलंबित मजुरीचा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता.
मंजूर निधी असूनही मजुरी वितरणात होत असलेल्या विलंबामुळे मजुरांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून रोजगार हमी योजना (EGS) विभागाने याबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मार्च अखेरपर्यंत मजुरांच्या खात्यात मजुरी जमा न झाल्यास पुढील लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
— रविकुमार शिंदे
राज्य सचिव – भारतीय पत्रकार अधिकार परिषद, महाराष्ट्र
तालुका संघटक – हिंदी मराठी पत्रकार संघ
#मनरेगा #MGNREGA #BreakingNews #MaharashtraNews #WorkerRights #EGS #PaymentDelay #Ahilyanagar #GovernmentScheme

21
4829 views

Comment