logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

दिवा येथे गटाराचे घाण पाणी घरात; नागरिक संतप्त, प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप

दिवा परिसरातील काळुबाई चाळ/ पार्वती चाळ, म्हात्रे गेट येथे गंभीर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जागा मालकाने आडवी भिंत उभारल्यामुळे गटार आणि संडासाचे घाण पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसत असल्याची धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
या समस्येमुळे शाळेतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला तसेच कामगार वर्गाला भविष्यात गंभीर आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार लोकप्रतिनिधींना तक्रारी करूनही कोणीही दखल घेत नसल्याचा आरोप केला आहे.
दिवा प्रभाग समितीवरही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, लोकसंख्येच्या तुलनेत #पाणी, #गटार, #रस्ता, #हॉस्पिटल, #शाळा आणि #गाडीपार्किंग यांसारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांनी या प्रकरणाची तात्काळ आणि गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

18
1629 views

Comment