जिल्ह्यात काही ठिकाणी मोबाईलचे खाजगी टॉवर तर काही ठिकाणी B.S.N.L. चे सरकारी मोबाईल टॉवर पण काहीच कामाचे नाही फक्त शो साठी आहेत
जिल्ह्यात काही ठिकाणी मोबाईलचे खाजगी टॉवर तर काही ठिकाणी B.S.N.L. चे सरकारी मोबाईल टॉवर जिल्ह्यातील प्रशासनाने जनतेच्या विकासाचा एक महत्वाचा भाग म्हणून गावोगावी निर्माण केले.
जिथे खाजगी मोबाईल टॉवर
आहेत तिथेच आजच्या घडीला लोकांना मोबाईल वरून बोलणं, ऑनलाईन काही कामं करणे, सोशल मीडिया चालवीने, व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम चालविणे व्यवस्थित सुरु आहे.
आणि त्या उलट ज्या ज्या गावी BSNL चे मोबाईल टॉवर आहेत तिथे मात्र फक्त टॉवर दिसतात. काम काहीच नाही.
या सर्व टॉवरची नेटवर्क रेंज एवढी कमी आहे की, एका छोटयाशा गावात सुद्धा सुरळीत, फोन लागत नाही,
नेट चालत नाही.
हे सर्व टॉवर होण्या आधी गावातील सर्व लोकं आप आपल्या पद्धतीने कसे तरी आपला काम चालवत होते.
पण गावात टॉवर झाल्यापासून सर्वांनी BSNL चे सिम कार्ड खरेदी केले.
टॉवर चालू असूनही पूर्णपणे नसल्या सारखेच आहे.
आम्ही पैडी ग्रामवासियानी ठराव पारित केला व प्रशासनाला सांगितलं की आम्हाला BSNL सोडून दुसरा कोणताही टॉवर बनवून दया.
पण त्यांनी आमचं एक ऐकलं नाही.
आज आम्ही एका महिन्याचा रिचार्ज करूनही पाहिजे तसा
नेटवर्क राहतच नाही.
गावापासुन अर्ध्या कि.मी.वर कव्हरेज राहत नाही.
मागूल आठ दिवसात तर गावात कोणाचाही मृत्यू झाला तरी गावातून फोनच लागत नाही.
म्हणून गावातील नागरिकांत
खूप नाराजगी व संताप उसळला आहे.
या बद्दल BSNL कर्मचारी कधीच दखल घेत नाही.
करोडो रु. खर्च करून
BSNL चे टॉवर फक्त शोभीते साठी गावाबाहेर उभे करून
कंत्राट दार व प्रशासासन जनतेच्या पैश्याचा दुरुपयोग करीत आहेत. या बद्दल आम्ही कोटमी पो. म. के.येथील सहायक प्रभारी अधिकाऱ्यांना पण तोंडी सांगितलेला आहे.
आता सामान्य व्यक्ती कोणापुढे आपले म्हणणे मांडणार..?
खोटं असेल तर गावात येऊन
BSNL कर्मचारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तसेच पत्रकार बंधूनी येऊन चौकशी करावी...
जिल्ह्यातील सर्व वृत्त पत्राला
ही बातमी लावायला सांगावे.
(पैडी, जडेगाव, मारदा)
{_नितीन दादा पदा रा. पैडी.._ )