शिक्षण महर्षी आदरणीय दत्ताजी मेघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
II भावपूर्ण श्रद्धांजली ॥
*"जनसेवेचा ध्यास घेतलेल्या एका महान पर्वाचा अंत!"*
शिक्षण महर्षी आदरणीय दत्ताजी मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक महान वटवृक्ष कोसळला आहे. शून्यातून विश्व निर्माण करून, अत्यंत गरिबीतून वर आलेल्या या मोठ्या मनाच्या माणसाने आपली संपत्ती जनतेसाठी 'ट्रस्ट' म्हणून जनतेच्या सेवेसाठी अर्पण केली, हे त्यांचे कार्य थक्क करणारे आहे.
ज्यांनी गरिबांच्या मुलांसाठी महागडे शिक्षण मोफत उपलब्ध करून दिले आणि समाजसेवेचा एक नवा वस्तुपाठ घालून दिला, अशा खऱ्या अर्थाने समाजासाठी झटणाऱ्या महामानवाचा हा प्रवास आज थांबला आहे. आरोग्य क्षेत्रातही त्यांनी वैद्यकीय शिक्षण आणि अद्ययावत सुविधा सामान्यांच्या दारापर्यंत आणल्या. जनसेवेचा ध्यास घेतलेल्या अशा या पवित्र आत्म्याला ईश्वर शांती लाभो, हीच प्रार्थना.विनम्र श्रद्धांजली!