logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

दरोडा टाकुन लुटणारी "बदाम गँग" 48 तासांत जेरबंद;10 दरोडे, जबरी चोरी,घरफोडीचे गुन्हे उघडकीस...

दरोडा टाकुन लुटणारी "बदाम गँग" 48 तासांत जेरबंद;10 दरोडे, जबरी चोरी,घरफोडीचे गुन्हे उघडकीस...

पाथर्डी (शिवप्रहार न्यूज नेटवर्क)नमूद बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी दगडु भिमराज बडे, वय- 47 वर्षे रा. मळईवस्ती, चिंचपुर पांगुळ, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर हे दिनांक 18/03/2026 रोजी रात्री 01/00 वा. चे सुमारास राहते घराची कडी आतमधुन लावुन घरात फिर्यादी व त्यांची पत्नी बेडरुम मध्ये झोपलेले असतांना अनोळखी 06 इसमांनी फिर्यादीचे घराचा दरवाजाची कडीकोयंडा तोडुन घरात प्रवेश करुन बेडरुममध्ये येवुन फिर्यादीच्या गळ्याला चाकु लावुन जिवे ठार मारण्याची धमकी देवुन फिर्यादीचे पत्नी यांचे गळ्यातील सोन्याची पोत तोडुन घेवुन कपाटातील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा एकुण 1,62,000/-रु कि.चा मुद्देमाल दरोडा टाकुन चोरुन नेला आहे. सदर घटनेबाबत पाथर्डी पोलीस ठाणे गु. र. नं. 270/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दाखल असलेल्या दरोडा व जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केलेले आहे.
पोनि श्री.किरणकुमार कबाडी यांनी घटनाठिकाणी भेट देवुन सदर गुन्हा उघडकीस आणणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/ हरिष भोये, पोउपनि/अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार, सुरेश माळी, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, शाहिद शेख, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड, बाळासाहेब खेडकर, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, महिला पोलीस अंमलदार वंदना मोढवे, चालक महादेव भांड, भगवान धुळे, यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना व मार्गदर्शन करुन सदरचे पथक रवाना करण्यात आले होते.वरील पथकाने गुन्हा ठिकाणी भेट देवुन, अशा प्रकारे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील आरोपींची माहिती संकलित करुन आरोपींची माहिती काढत असतांना पथकास व्यवसायीक कौशल्य व गुप्त बातमीदारामाचे मार्फत सदरचा गुन्हा हा रेकार्डवरील आरोपी नामे बदाम काळे,रा. शिरोडी ता.गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर याने त्याचे साथीदारासह केला असुन तो सध्या त्याचे साथीदासह मजले चिंचोली गावचे शिवारातील संजय आव्हाड यांचे वस्तीवरील घरात असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पथकाने तात्काळ नमुद ठिकाणी मजले चिंचोली गावचे शिवारातील संजय आव्हाड यांचे वस्तीवर जावुन जावुन सापळा रचुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नांवे 1) बदाम कडु काळे, वय- 22 वर्षे रा. शिरोडी ता.गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर, 2) साईनाथ विष्णु चव्हाण वय- 22 वर्षे रा. मुडदे वडगाव ता.गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर, 3) ऋतिक हसमुख चव्हाण वय- 20 वर्षे रा. खोसपुरी ता.जि. अहिल्यानगर, 4) महेश उर्फ उमेश नंदु काळे वय- 20 वर्षे रा. खोसपुरी ता. जि. अहिल्यानगर, 5) भैय्या कडु काळे वय- 20 वर्षे रा.शेकटा, ता. गंगापुर जि. अहिल्यानगर 6) लाकर करमत काळे वय- 26 वर्षे रा.शेकटा ता. गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले आहे.आरोपी नामे बदाम काळे यास विश्वासात घेवुन गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने नमुद गुन्हा साथीदासह केल्याचे कबुली देवुन गुन्हा करते वेळी त्याचे सोबत 7) ताराचंद विरुपण भोसले रा. गाजगाव ता.गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर(फरार) 8) बोट्या उषा भोसले रा.अंतापुर ता.गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर(फरार) 9) तिरंगा कडु काळे रा. शिरोडी ता.गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर(फरार) असे असल्याचे सांगितले आहे.
सदरचे आरोपी हे गुन्हा केल्यानंतर स्वत:चे घरी न राहता इतर ओळख असलेल्या इसमांचे घरी राहत होते. त्यामुळे सदरचे आरोपी हे सहजासहजी मिळुन येत नव्हते. ताब्यातील आरोपींना इसम नामे संजय भागचंद आव्हाड वय 50 वर्षे, रा. आव्हाडवस्ती, मजले चिंचोली, ता. जि. अहिल्यानगर यांना आश्रय दिलेला असल्याने त्यास गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेले आहे. ताब्यातील आरोपीचे कब्जातुन 10,25,000/-रु कि.चे 69 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे, 46,000/-रु कि.चे 6 वेगवेगळे कंपनीचे मोबाईल, 500/-रु कि.चे एक चाकु, एक गलोर, एक लोखंडी कत्ती, एक लोखंडी कटावणी,एक लोखंडी भाला असे एकुण 10,71,500/-रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपीने अशाप्रकारचे आणखी इतर गुन्हे केले आहेत काय याबाबत सखोल व बारकाईने तपास करता आरोपीकडुन १० गुन्हे उघडकीस आलेले आहेत. आरोपी नामे बदाम कडु काळे हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेविरुध्द यापुर्वी अहिल्यानगर व छत्रपती संभजीनगर या जिल्ह्यामध्ये ०७ गुन्हे दाखल आहेत.तसेच आरोपी नामे महेश नंदु काळे हा देखील रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेविरुध्द यापुर्वी अहिल्यानगर व छत्रपती संभजीनगर या जिल्ह्यामध्ये ०७ गुन्हे दाखल आहेत.
ताब्यातील आरोपी व मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
12 views

Comment