भोंदू बाबा अशोक खरातचे काळे साम्राज्य उद्ध्वस्त!
महाधडाका: भोंदू बाबा अशोक खरातचे काळे साम्राज्य उद्ध्वस्त!
नाशिकच्या अध्यात्मिक क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या अशोक खरात याच्या पापाचा घडा आता भरला आहे! तपासात जे समोर येतंय ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. स्वतःला 'महाराज' म्हणवून घेणाऱ्या या भोंदूने फसवणुकीतून तब्बल १५०० कोटींची माया जमवल्याचा खळबळजनक अंदाज वर्तवण्यात येत आहे!
बातम्यातील मुख्य हायलाइट्स:
५२ मालमत्ता उघड: खरात आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावे तब्बल ५२ सातबारा उतारे सापडले आहेत. नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यात हे साम्राज्य पसरलंय.
अधिकारीही संशयाच्या भोऱ्यात: धक्कादायक म्हणजे, काही सातबारा उताऱ्यांवर नामांकित बांधकाम कंपन्यांसह तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांचीही नावे असल्याची माहिती समोर येत आहे.
पीडित महिलांचा आक्रोश: एका महिलेच्या तक्रारीनंतर आता आणखी तीन पीडित महिला धाडसाने पुढे आल्या आहेत. शोषणाचे हे जाळे किती मोठे आहे, याचा तपास आता SIT प्रमुख तेजस्वी सातपुते करत आहेत.
इन्कम टॅक्स रडारवर: कोट्यवधींच्या व्यवहारांची आता प्राप्तिकर विभागाकडूनही (Income Tax) कसून चौकशी होणार आहे.
सावधान! धर्माच्या नावाखाली सामान्यांना लुटणाऱ्या अशा भोंदूंपासून सावध राहा. नाशिक पोलिसांनी या प्रकरणात जमीन व्यवहार करणारा एजंट दीपक लोंढे यालाही ताब्यात घेतले आहे.