logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नागपूरात अत्याधुनिक डायग्नॉस्टिक सेंटरचे आज लोकार्पण

नागपूर : शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सवलतीच्या दरात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने “Gangadharrao Fadnavis Memorial Diagnostic Centre” या अत्याधुनिक केंद्राचा लोकार्पण सोहळा आज, रविवार (२२ मार्च २०२६) रोजी सायंकाळी ६ वाजता सोमलवाडा येथील श्रीराम नगर, पावन भूमी मैदानात आयोजित करण्यात आला आहे.
या प्रकल्पाचे उद्घाटन Dr. Mohan Bhagwat यांच्या शुभहस्ते होणार असून, प्रमुख उपस्थितीमध्ये Nitin Gadkari, Devendra Fadnavis आणि Chandrashekhar Bawankule यांचा समावेश आहे. तसेच विशेष अतिथी म्हणून Nita Thackeray आणि Maya Ivnate उपस्थित राहणार आहेत.
या डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये 3 टेस्ला एमआरआय (२ मशीन), 128 स्लाइस सीटी स्कॅन (२ मशीन), २५ मशीनसह डायलेसिस सेंटर, आधुनिक पॅथॉलॉजी, अल्ट्रासाऊंड, एक्स-रे आदी सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत.
श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनतर्फे आयोजित या उपक्रमामुळे नागपूरमधील सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांना परवडणाऱ्या दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळणार असून, शहराच्या आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे.

0
113 views

Comment