सोशल न्युज*
*डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याची मनापासून सेवा करणाऱ्या *कांबळे दाम्पत्याचा सत्कार
एआय एमन्युज शाशिकांत भालेराव.
नाशिक नारोड. दि 18 / 03/2026 रोजी सायं.6.00 महाकर्मभुमी बुद्धविहार येथे कांबळे दामपत्यांचा गौरव करून सत्कार करण्यात आला.
पुतळ्या संदर्भात माहीती.
माझी खा. दादासाहेब गायकवाड यांचे शिलेदार किल्लेदार मोहनराव हैबतराव कांबळे यांचे चिरंजीव कुणाल मोहनराव कांबळे व त्यांच्या सुनबाई संगीता कुणाल कांबळे हे दोघे पती पत्नी गेली 12 वर्षां पासुन ना. रोड रेल्वे स्टेशन समोर विश्वरत्न महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार भिमराव रामजी डॉ बाबासाहेब आंबेडकर. यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे दर सोमवारी स्वच्छतः करून मनोभावे सेवा करतात. हा वारसा त्यांना त्यांच्या वडीलां पासून लाभलेला आहे.कारण ना.रोड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासाठी दादासाहेब गायकवाड यांच्याअध्यक्षते खाली बैठक झाली त्यावेळी नारोड चे कार्यकर्ते यांनी आम्ही जागा सुचवून त्याठिकाणी पुतळा बसवू असे सांगण्यात आले. परंतु चार पाच दिवसा नंतर स्वतः दादासाहेब गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना विचारले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासाठी जागा भेटली का विचारल्यावर कोणीच काही बोलले नाही. शेवटी मोहनराव कांबळे यांनी दादासाहेब गायकवाड यांना शब्द देऊन तीन दिवसात जागा शोधून पुतळा त्या जागेवर बसवावा अशी विनंती केली होती. ती जागा रेल्वे स्टेशन समोर होती फक्त त्याजागेवर एक अडचण अशी होती की, तेथुन त्याकाळी गटारीचा नाला वाहत होता.ही माहिती दादासाहेब गायकवाड यांना सांगितली तेव्हा त्यांना पण थोडे विचित्र वाटले पण जेव्हा मोहनराव कांबळे यांनी त्यांना भविष्यात ह्या जागेला पुतळ्या मुळे खुप महत्त्व प्राप्त होईल आणि नंतर हा पुतळा भविष्यात मध्यभागी उभा राहील हे समजून सांगितल्यावर दादासाहेब गायकवाड यांनी काही कार्यकर्त्यांचा रोष पत्करून मोहनराव कांबळे यांनी केलेली जागा निश्चित करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविला. त्याकाळी ज्यांनी हा पुतळा बसविण्यास विरोध केला होता. मोहनराव कांबळे (किल्लेदार ) ही पदवी स्वतः दादासाहेब गायकवाड यांनी मोहनराव कांबळे यांना दिली व आपला खरा शिलेदार आहे असे त्यावेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवितांना सांगितले. मोहनराव कांबळे यांनी भविष्यात हा पुतळा केंद्रबिदू राहील आज ते खर ठरले. आज ना.रोड रेल्वे स्टेशन समोरील महामानव विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा ना.रोड शहराचे नाक आहे. याच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याची गेली 12 वर्षापासून कांबळे दाम पत्य मनोभावे सेवा करून स्वच्छ ठेवण्याचे कार्य करत आहे. त्यांच्या या कार्याची पावती म्हणुन महाकर्मभुमी बुद्धविहार येथे किल्लेदार मोहनराव हैबतराव कांबळे यांचा मुलगा कुणाल मोहनराव कांबळे व त्यांची पत्नी संगीता कुणाल कांबळे सुन यांचा उल्लेखनिय सेवेच्या कार्याचा गौरव करून ना.रोड सार्वजनिक .जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आला यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे 2025-2026 चे अध्यक्ष आकाशभाऊ भालेराव, भारत निकम, महेंद्र तायडे, काळे जाधव व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.