नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे.
नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. खरात याने अनेक महिलांवरती लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. अशोक खरात यांच्या ट्रस्टच्या सदस्या रुपाली चाकणकर असल्याचे समोर आले, यामुळे आता चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी एक मोठा दावा केला आहे.रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला ते चांगलंच झालं, पण केवळ त्यांच्यापर्यंतच हे प्रकरण नाही. याप्रकरणात अनेक उच्चपसदस्थ अधिकारी आहेत, असा खळबळजनक दावा जाधव यांनी केला.