धोत्रा. भनगोजी , येथे मुस्लिम बांधवांच्या भेटी घेऊन रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त शुभेच्छा
, हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक!!
मन्सूर शहा धोत्रा . भ.चिखली.:---
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांशी संवाद साधत, त्यांच्या आनंदात सहभागी होत आणि सणाच्या शुभेच्छा देत आपुलकीचे नाते अधिक दृढ केले.
रमजान ईद हा संयम, त्याग, श्रद्धा आणि बंधुभाव यांचा संदेश देणारा सण आहे. समाजात एकोपा, शांतता आणि परस्पर सन्मान टिकवून ठेवण्याची प्रेरणा हा सण देतो.
या पवित्र सणाच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्यात आनंद, समाधान, उत्तम आरोग्य आणि समृद्धी नांदो, तसेच समाजात सौहार्द अधिक वृद्धिंगत होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा, देत, सरपंच गुलाबसिंग सोनारे, माजी सरपंच आमदार बळीरामजी काळे, विवेक पवल, श्याम बापू देशमुख वरिष्ठ पत्रकार, अशोक जी भोसले, कडूबा भुसारी, जय हरी, प्राध्यापक संदीप उन्हाळे सर, मन्सूर शहा पत्रकार, शेख गणीभाई बागवान सामाजिक कार्यकर्ते, शेरू भाई, नादर भाई, आयुब शहा, हसन शहा, सिकंदर शहा, अमीर, हमजा,तसेच सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहून एकमेकांना शुभेच्छा दिल्या!!