logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भाजप नेते विनोदभाऊ वाघ यांच्याकडून पाहणी या घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आणि लोकप्रिय नेते विनोदभाऊ वाघ

लोणार (प्रतिनिधी): दिपक कायंदे
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पुन्हा एकदा बळीराजाला बसला असून, लोणार तालुक्यातील येवती परिसरात झालेल्या तुफान गारपिटीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटामुळे हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे.
पिकांची मोठी हानी
मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत होता, मात्र अचानक झालेल्या गारपिटीने येवती शिवारातील पिकांचे अक्षरशः सडे पडले. यामध्ये गहू, हरभरा आणि फळबागांचे सर्वाधिक नुकसान झाले असून, काढणीला आलेली पिके जमिनीदोस्त झाली आहेत.
भाजप नेते विनोदभाऊ वाघ यांच्याकडून पाहणी
या घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आणि लोकप्रिय नेते विनोदभाऊ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, संतोष कांगणे यांनी प्रत्यक्ष येवती येथील बाधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी त्यांचे सांत्वन केले आणि या संकट काळात भाजप खंबीरपणे पाठीशी असल्याची ग्वाही दिली.
तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी
यावेळी संतोष कांगणे यांनी शासनाकडे आक्रमक मागणी केली की:
महसूल विभागाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही तांत्रिक अडचणीत न अडकवता थेट आर्थिक मदत जाहीर करावी.
विमा कंपन्यांनी देखील तत्परतेने दखल घेऊन शेतकऱ्यांचे दावे मंजूर करावेत.
"शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत असताना या गारपिटीने कंबरडे मोडले आहे. सरकारने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष मदत करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा इशारा यावेळी देण्यात आला.

67
3503 views

Comment