शिरूर मध्ये बिस्मिल्ला दर्गाला भारतीय जनवादी पार्टी तर्फे रमजान ईद निमित्त चादर व शेरा टाकताना हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक.
पुणे जिल्हा रिपोर्टर. 21/03/26 शिरूर काची आळी बिस्मिल्ला दर्गाला भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिल मल्लाव व भारतीय जनवादी पार्टी पुणे जिल्हाध्यक्ष श्री. लक्ष्मण मल्लाव,श्री. राजू / निलेश फकीरचंद मल्लाव
विशाल रामसिंग परदेशी, श्री संजय वसंत मल्लाव व कलीम शेख व सचिन ज्ञानेश्वर ढेरे या सर्वांनी बिस्मिल्ला दर्गाला चादर व शेरा चढविताना कार्यकर्त्यांनी उपस्थिती दिली. रमजान ईद ज्याला ईद उल फित्र असे म्हटले जाते.हा इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र आणि आनंदाचा क्षण आहे हा सण रमजान महिन्याच्या शेवटी साजरा केला जातो रमजान महिना हा उपवास प्रार्थना प्रकार आणि आत्मशुद्धीचा महिना मानला जातो या महिन्यात उपवास केल्यानंतर जेव्हा चंद्र दर्शन होते तेव्हा दुसऱ्या दिवशी ईद साजरी केली जाते रमजान महिना इस्लामच्या पंचस्तंबापैकी एक मानला जातो. या महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास रोजा ठेवला जातो या उपवासाच्या काळात अन्न, पाणी वाईट विचार व चुकीच्या कृती पासून दूर राहण्याची कठोर पालन केले जाते रोजा हा केवळ शारीरिक तपस्याच नव्हे, तर आत्मशुद्धी आणि संयमाचा एक मार्ग मानला जातो चंद्र दर्शन झाल्यानंतर रमजान ईद साजरी केली जाते हा दिवस आनंद प्रेम आणि एकोपा यांचे प्रतीक आहे ईदच्या दिवशी ईद नमाज अदा केली जाते.या नमाज साठी मुस्लिम बांधव मज्जिद मध्ये एकत्र येतात आणि अल्लाचे आभार मानतात. ईदच्या दिवशी सकाळी विशेष नमाज अदा केली जाते आणि एकमेकांना गळा भेट देऊन ईद मुबारक शुभेच्छा दिल्या जातात या सणाची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे जकात आणि फितरा आहे ज्या द्वारे गरिबांना आणि गरजूंना मदत केली जाते शीरखुर्माचा गोडवा आणि हीच आनंद या सणात अधिक रंग भरतो हा सण आपसापसातील भेदभाव विसरून प्रेम शांतता आणि विश्वबंधुत्वाची शिकवण देतो. सर्व मुस्लिम बांधवास आमच्या पक्षा तर्फे भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कार्यालय तसेच जय भवानी मित्र मंडळ काची आळी यांच्याकडून रमजान ईद मुबारक....💐💐💐💐