logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

National Anti Corruption & Operation Committee of India या संस्थेमध्ये पंकज प्रभाकर बागडे यांची सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल परिसरातून त्यांचेअभिनंदन

लोणार (प्रतिनिधी) – National Anti Corruption & Operation Committee of India या संस्थेमध्ये पंकज प्रभाकर बागडे यांची सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
भ्रष्टाचारमुक्त भारताच्या उद्देशाने कार्य करणाऱ्या या संस्थेमध्ये बागडे यांची निवड होणे ही लोणार शहरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या निवडीमुळे सामाजिक कार्याला अधिक चालना मिळणार असून, जनतेमध्ये पारदर्शकता आणि जागरूकता वाढवण्याचे काम अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पंकज बागडे हे समाजाभिमुख कार्यात सक्रिय असून, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, नातेवाईक आणि शहरातील नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
यावेळी अनेकांनी “आपल्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणाल” असा विश्वास व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

0
345 views

Comment